आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 'Article 15 ': Teaser Out Of Ayushmann Khurrana's Film, 46 Seconds, Says All About That Article

'आर्टिकल 15' : आयुष्मान खुरानाच्या चित्रपटाचा टीजर आउट, 46 सेकंदात समजून सांगितले आर्टिकल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : आयुष्मान खुरानाची फिल्म 'आर्टिकल 15' चा टीजर आणि पोस्टर सोमवारी रिलीज केले गेले. या चित्रपटाचे दिग्दर्शन मुल्क फेम दिग्दर्शक अभिनव सिन्हाने केले आहे. टीजरमध्ये आयुष्मान पोलिसांच्या ड्रेसमध्ये दिसणार आहे. 

 

 

टीजरमध्ये आयुष्मानचा दमदार आवाज... 
46 सेकंदाच्या या टीजरमध्ये आयुष्मानच्या आवाजामध्ये भारतीय संविधानाचे आर्टिकल 15 समजावले आहे. यामध्ये आयुष्मान म्हणत आहे - 'धर्म, नस्ल, जाति, लिंग, जन्मस्थान या इनमें से किसी भी अधिकार पर राज्य अपने किसी भी नागरिक से कोई भेदभाव नहीं करेगा...ये मैं नहीं कह रहा हूं ये भारत के संविधान में लिखा है। 1950, फर्क बहुत कर लिया अब फर्क लाएंगे।'

 

आयुष्मान खुरानाने इंस्टाग्रामवर शेयर केले पोस्टर... 

 

 

सत्य घटनेवर आधारित आहे ही फिल्म...  
फिल्म संविधानातील याच आर्टिकलवर आधारित आहे. फिल्मची कहाणी उत्तरप्रदेशच्या बदायूंमध्ये झालेल्या रेप आणि हत्येच्या घटनेवर आधारित आहे. या घटनेत दोन दलित अल्पवयीन मुलींची गैंगरेप करून हत्या करण्यात आली. या घटनेची देश-परदेशात खूप निंदा झाली. ही घटना 27 मेची होती. त्यामुळे मेकर्सने टीजर 27 मेला रिलीज केला. टीजरमध्ये आयुष्मान खूप इंटेस लुकमध्ये दिसत आहे. टीजरच्या शेवटी ट्रेलर रिलीज डेटदेखील दाखवली गेली आहे. फिल्मचा ट्रेलर 30 मेला रिलीज होईल. 

बातम्या आणखी आहेत...