आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कलम 370 हा महाराष्ट्रचा मुद्दा नाही; मध्यप्रदेश, राजस्थानसारखा बदलाचा मूड महाराष्ट्रात जाणवतोय -शरद पवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रदीप राजपूत

जळगाव - राष्ट्रीय सुरक्षिततेच्या मुद्याची ढाल करून केंद्रीय नेतृत्वाने लोकसभा निवडणुक जिंकल्या, देशाचा विषय असल्याने जनतेनेही त्यांना पाठिंबा दिला, परंतू महाराष्ट्रातील विषय वेगळे आहेत. कलम 370, सर्जिकल स्ट्राईक हे गुळगुळीत विषय महाराष्ट्रात यावेळी चालणार नाहीत. शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, वाढलेली गुन्हेगारी हे विषय महाराष्ट्राचे असल्याने यावेळी मध्यप्रदेश आणि राजस्थानसारखी बदलाची हवा आहे. जनतेचा मुड मला जाणवत असल्याने या निवडणुकीत मी विशेष रस घेवून काही समिकरण मांडल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

निवडणुकीच्या दौऱ्यावर जळगावात मुक्कामाला असलेल्या शरद पवारांनी दोन दिवसात वेगवेगळ्या लोकांच्या भेटी, बैठका घेतल्या. मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला माघार घेण्यास सांगुन अपक्षाला पाठिंबा देण्याचा प्रयोग त्यांनी केला. यानिमित्त जळगावात आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. केंद्रात सरकार असून राजस्थान आणि मध्यप्रदेशात जनतेले भाजपची राज्य सरकारे उलथून लावली. महाराष्ट्रात 5 वर्षात शासनाकडे सांगण्यासारखे काहीच नाही. त्यामुळे येथेही सत्ताबदल अटळ आहे. महागाई, बेरोजगारी, आत्महत्या, कायदा -सुव्यवस्थेचे ढिंडवडे या चिंतेच्या बाबी आहेत. विरोधकांना चौकशा, ईडी, इनकम टॅक्स, पोलिस या यंत्रणाचा धाक दाखवून पक्षात सामावून घेतले जात आहेत. जाणारे मजबुर असतीलही परंतू जनतेला हे सर्व दिसत असल्याने यावेळी बदलाची हवा असल्याचे पवार यावेळी म्हणाले. मुक्ताईनगरमध्ये रोहिणी खडसेंच्याविरोधात अपक्ष उमेदवारी करणारे चंद्रकांत पाटील यांच्याशी यावेळी पवारांनी राष्ट्रवादी कार्यालयात बंदद्वार चर्चा केली.

घरी गेलो की माझा 7/12 चेक करून घेतो
कालच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी सत्ता अाल्यास शेतकऱ्यांचा ७/१२ बारा काेरा करू अशी घाेषणा केली. मी जळगावच्या दाैऱ्यावर असल्याने याबद्दल जास्त माहीत नाही. परंतु घरी गेलाे मी माझा ७/१२ चेक करून घेताे, कदाचित अाताही त्यांचेच सरकार असल्याने शिवसेनेने ७/१२ काेरा केला असेल असा चिमटा काढत शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंनी ५ वर्षात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून ७/१२ उतारा काेरा का केला नाही असा प्रश्न उपस्थित केला.

मी अाकडेबाज माणूस नाही
भाजपचे अनेक लाेक काही दरराेज दरराेज अाकड्यांचा वलग्ना करतात. परंतू मी मात्र काेणताही अाकडा सांगणार नाही. अाकड्यात खेळणारा वर्ग वेगळा असताे. मी अाकडेबाज नाही अाणि ज्याेतीषी देखील नाही, त्यामुळे कुणाच्या किती जागा येतील हे मी कधीही सांगत नाही. बदल हाेईल हे मात्र अंदाज अाणि अनुभवावरून सांगू शकते असे पवार यावेळी म्हणाले.

सुशिलकुमार शिंदेपेक्षा राष्ट्रवादी मला अधिक कळते
सुशिलकुमार शिंदे यांनी नुकतेच दाेन्ही पक्ष थकले असल्याने राष्ट्रवादीने काॅग्रेसमध्ये विलीन व्हावे असे वक्तव्य केले हाेते. याबाबत विचारले असते शरद पवार म्हणाले की, शिंदे त्यांच्या पक्षाविषयी बाेलले असतील. मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष असल्याने त्यांच्यापेक्षा मला निश्चितच राष्ट्रवादीबद्दल अधिक माहिती अाहे. मी थकलेलाे नसल्याने त्यांच्या वक्तव्याला अर्थ नसल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...