काश्मीर / कलम 370 भळभळती जखम; त्यामुळे काश्मीर रक्तबंबाळ, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांची टिप्पणी

पाकिस्तान परत एकदा दोन भागात विभागला जाईल- राजनाथ

दिव्य मराठी वेब

Sep 23,2019 09:50:35 AM IST

पाटणा - कलम ३७० म्हणजे भळभळती जखम झाली होती, त्यामुळे काश्मीर रक्तबंबाळ झाले होते, अशी टिप्पणी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी रविवारी केली. राज्यातील तीन चतुर्थांशपेक्षा जास्त लोकांनी हे कलम हटवण्याचे समर्थन केले आहे, असा दावा त्यांनी केला. पाटणा येथे भाजपच्या जनजागरण सभेला संबोधित करताना राजनाथसिंह म्हणाले, 'पाकिस्तानमध्ये किती हिंमत आहे आणि काश्मीरमध्ये किती दहशतवादी तयार होतात हे आता पाहू.'


या सभेत कलम ३७० हटवण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाबद्दल नेत्यांनी आपली मते व्यक्त केली. राजनाथसिंह म्हणाले की, एक राष्ट्रवादी पक्ष म्हणून भाजपने या मुद्द्यावर आपली भूमिका कधीही सौम्य केली नाही. आता आगामी पाच वर्षांत जम्मू-काश्मीर पूर्णपणे बदलेल. आता दहशतवाद थांबल्यानंतरच पाकिस्तानशी कुठलीही चर्चा होईल. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, पाकिस्तानशी आता फक्त पीओकेवरच चर्चा होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

X
COMMENT