आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटरनेटविना काश्मिरींनी १०० दिवस काय केले?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमित कुमार निरंजन  

नवी दिल्ली/श्रीनगर - कलम  ३७० हटवल्यानंतर ५ ऑगस्टपासून काश्मीर खोऱ्यात इंटरनेट बंद आहे. १२ नोव्हेंबरला काश्मिरात इंटरनेट सेवा बंद होण्यास शंभर दिवस झाले. आताही येथे इंटरनेट बंद आहे. यामुळे काश्मिरींना अनेक अडचणींचा सामना करावा लागला असला तरी इंटरनेट वापरण्यात वाया जाणारा वेळही वाचू लागला. तरुणांनी वेबसिरिज पाहिल्या, तर ज्येष्ठांचा वेळ बगिच्यात जाऊ लागला. लोकांनी जास्त पुस्तकेही वाचली. खोऱ्यातील लोक महाविद्यालयाचा फॉर्म भरण्यासाठी जम्मू किंवा दिल्ली जाणाऱ्या गल्लीतील मुलांना वेब सिरीज आणि चित्रपटांची यादी देत असत. यावेळी श्रीनगर, अनंतनागसह खोऱ्यातील एक डझन जिल्ह्यात सर्वात जास्त दिवसांपर्यंत सर्वसामान्यांसाठी इंटरनेट सेवा बंद आहे. मोहम्मद जेबान वफाई श्रीनगरमध्ये राहतात. त्यांना इग्नूचा अर्ज भरण्यासाठी सप्टेंबरमध्ये श्रीनगरहून दिल्लीला यायचे होते. जवळपास ५० नातेवाइकांनी चित्रपट, वेबसिरिजची यादी दिली. दिल्लीत आल्यावर त्यांनी दीडशेपेक्षा जास्त चित्रपट, वेबसिरिज आणि गाणी हार्डडिस्कमध्ये आणली.तर श्रीनगरच्या शनतनगरमधील निवृत्त अधिकारी बशीर अहमद शाह सांगतात की, टीव्हीचे रिचार्ज सप्टेंबरच्या आधीच संपले. इंटरनेट- कॉलिंग सुविधाही बंद झाली. यामुळे वेळ घालवणे सोपे नव्हते. मी आधी कम्युनिटी पार्कमध्ये सकाळी फिरायला जायचो. मात्र आता संचारबंदी उठवल्यानंतर या पार्कमध्ये सकाळ- संध्याकाळ फिरायला जातो. सध्या येथे पाच ते सहा पट जास्त गर्दी दिसायला लागली आहे. 

बातम्या आणखी आहेत...