जागतिकीकरणाच्या अंतास सुरुवात / जागतिकीकरणाच्या अंतास सुरुवात

अंशुल त्रिवेदी

Jan 24,2017 03:00:00 AM IST
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली आहे. आजवर राजकारणात कधीही सहभागी न झालेल्या ट्रम्प यांचा हिलरी क्लिंटन यांच्यावर विजय हा इतिहासात एक अनपेक्षित धक्का म्हणून गणला जाईल. अनपेक्षित का? ट्रम्प यांनी केवळ डेमोक्रेटिक पार्टीचाच नव्हे तर रिपब्लिकन पार्टीला तीव्र विरोध केला, म्हणूनच ते विजयी झाले. एका अर्थाने त्यांनी राजकारणातील मुख्य प्रवाहाच्या विरोधात जाऊन निवडणूक जिंकली आहे.

१९८० मध्ये राष्ट्राध्यक्ष रेगन यांच्या कार्यकाळापासून रिपब्लिकन आणि डेमोक्रेटिक पक्षातील आर्थिक धोरणांतील फरक कमी होत गेला. जागतिकीकरण आणि खासगीकरणाची धोरणे कोणत्याही सरकारच्या काळात फारशी बदलत नाहीत. त्यामुळे उत्पादन क्षेत्रातील नोकऱ्या चीनसारख्या देशांमध्ये गेल्या. परिणामी दुसऱ्या महायुद्धानंतर तेथे आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणावर निर्माण होऊ लागली. मोठ्या कंपन्या आणि बँका दोन्ही पक्षांना निधी पुरवत होते. २००८ मध्ये मंदी आली. या लाटेत कंपन्या वाचल्या पण सामान्य नागरिकांचे नुकसान झाले. मुख्य प्रवाहातील नेत्यांवरील नागरिकांचा विश्वास उडाला. हिलरी क्लिंटन याच मुख्य प्रवाहाच्या शिल्पकार होत्या. याच अविश्वासाचा परिपाक म्हणजे त्या वेळी नसलेल्या ओबामा यांनी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाला पराभूत केले होते. हिलरींवरील विश्वासाबाबत जनता साशंक होती, त्यामुळे ट्रम्प यांचा विजय झाला. ट्रम्प यांनी आपल्याच पक्षाच्या आर्थिक धोरणांविरुद्ध जाऊन उत्पादन क्षेत्रातील नोकऱ्या परत आणू, असे अाश्वासन दिले.
अमेरिकेची उत्पादने खरेदी करा आणि अमेरिकन नागरिकांना नोकरीत प्राधान्य द्या, हे त्यांचे ब्रीदवाक्य आहे. तसेच नवनियुक्त अॅटर्नी जनरल यांनी एच-वन बी व्हिसा धोरणात बदल करण्याचे संकेत दिले आहेत. ट्रम्प आपल्या धोरणात पूर्णपणे यशस्वी झाले तर जागतिकीकरणाचा अंत जवळ आला हे समजावे.
अंशुल त्रिवेदी, जेएनयू पीएचडी स्कॉलर
X
COMMENT