Home | Mukt Vyaspith | article of ajay dhawale on army chief

लष्करप्रमुखांच्या नियुक्तीवर राजकारण नको

अजय धवले | Update - Dec 30, 2016, 03:00 AM IST

नव्या वर्षात विपिन रावत यांची लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती होईल. विरोधी पक्ष, विशेषत: काँग्रेसने आक्षेप घेऊनही तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सेवाज्येष्ठतेकडे दुर्लक्ष करत रावत यांना लष्करप्रमुख पद देण्यात आले आहे.

  • article of ajay dhawale on army chief
    नव्या वर्षात विपिन रावत यांची लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती होईल. विरोधी पक्ष, विशेषत: काँग्रेसने आक्षेप घेऊनही तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सेवाज्येष्ठतेकडे दुर्लक्ष करत रावत यांना लष्करप्रमुख पद देण्यात आले आहे. इंदिरा गांधींनी १९८३ मध्ये लेफ्टनंट जनरल ए. के. सिन्हा यांना डावलून लेफ्टनंट जनरल ए. एस. वैद्य यांना लष्करप्रमुख पद दिले होते. तेव्हा लष्करप्रमुखाची नियुक्ती हा सरकारचा विशेषाधिकार अाहे आणि यावरून राजकारण करू नये, असे बोलले जात होते. २०१४ मध्ये मनमोहनसिंह सरकारनेदेखील तत्कालीन अॅडमिरल शेखर सिन्हा यांना डावलून अॅडमिरल आर. के. धवन यांना लष्करप्रमुख केले. खरं तर लष्करासारख्या क्षेत्रात जिथे अत्यंत कमी वयातील अधिकारीही आपल्या कर्तृत्वाच्या बळावर मोठमोठ्या मोहिमांचे नेतृत्व करतात, अशा ठिकाणी ज्येष्ठ अथवा कनिष्ठतेवरून एखाद्या व्यक्तीची पात्रता ठरवणे चुकीचे आहे. लष्करासाठी प्रत्येक नागरिक समान असतो. मग असे निरर्थक वाद घालून सैनिकांचे मनोबल खच्ची करणे आपल्याला शोभून दिसते का? देशाच्या सीमा अधिक सुरक्षित राहाव्यात, या दृष्टीनेच कोणतेही सरकार पात्र व्यक्तीस लष्करप्रमुखाचे पद देईल, हे निश्चित.

    रावत यांच्याबाबतीत बोलायचे झाल्यास त्यांनी जम्मू-काश्मीरमधील १९ व्या डिव्हिजनचे कमांडिंग अधिकारी असताना उत्तम कामगिरी केली होती. लष्कराच्या मुख्यालयातील त्यांची कार्यपद्धती तसेच गेल्या वर्षी म्यानमारमधील त्यांच्या नेतृत्वाखालील सर्जिकल स्ट्राइकही उल्लेखनीय होती. पाकिस्तानसह चीनलगतच्या सीमांवरही त्यांचा उत्तम अभ्यास आहे. परंपरा मोडून नियुक्ती केल्याचा काँग्रेसचा आरोप असला तरी परंपरेला गतिशीलतेची जोड देण्याची गरज आहे. काळानुसार परंपरेतही बदल होत असतात.
    अजय धवले, २८
    कॉर्पोरेट वकील, माजी विद्यार्थी, नॅशनल लॉ इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी

Trending