आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दबावमुक्त राहा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दबावात राहून कोणतेही काम करू नये. कारण दबाव दीर्घ काळानंतर तणावाचे कारण बनत जाते. आजकाल तर लोक भक्तही दबावाखाली करतात. पूजा दबावात नाही, प्रामाणिकपणे करायला हवी. जीवनात संतुलन असायला हवे. आपल्या येथे प्रत्येक गोष्टीचे संतुलन आहे. दिवस आहे, तर रात्र आहे. उन्हाळा आहे, तर हिवाळा आहे. जन्म आहे, तर मृत्यू आहे. वाईट आहे तर चांगलेही आहे. चांगले आपल्यात उतरण्यासाठी अधिक दबाव बनवणेही एका नवीन वाइटास जन्मास घालते. वाइटाचा स्वभाव आहे खाली पडणे किंवा महत्त्व कमी होणे. त्याचे केंद्र मन असते. मनाचा स्वभाव आहे पतनाकडे जाणे. जसे पाणी खाली फेकण्यासाठी ताकद लागत नाही, परंतु वर घेऊन येण्यासाठी शक्ती लागते. त्याप्रमाणेच चांगल्यापर्यंत पोचण्यासाठी ताकद लागेल आणि त्याच ताकदीच्या नावाने लोक अति करू लागतात. कोणी इतके उपवास करीत असतो की ते शारीरिक दोष बनतात. आपणास अधिक त्रासानंतर सद्गुण मिळेल, आवश्यकता नाहीये. सारे जीवन संतुलनाचे नाव आहे. जीवनाचे सृजन करावे लागते आणि सृजन दबावमुक्त होऊनच केले जाऊ शकते. शरीर, मन व आत्मा तिन्ही आपल्याला काहीतरी मागत असतात. शरीराची आपली भाषा आणि शब्द आहेत. त्याची मागणी आहे, ती संतुलनाबरोबर पूर्ण करण्यात आल्यास मग मनाला आणखी हवे तरी काय असते. याला सावधानपूर्वक हँडल केले आणि आत्मा तर आनंद देण्यासाठी तयार आहे. आपण जागृत राहून त्या आनंदाला झेलायला पाहिजे. इतकी समज येताच आपले जीवन दबावमुक्त होईल. आपण प्रामाणिक राहू.
humarehanuman@gmail.com