Home | Mukt Vyaspith | article of parthivi joshi in divya marathi

गोंधळलेल्या वर्षाखेरीत ग्रामीण ऊर्जा प्रेरणादायी

पार्थिवी जोशी | Update - Dec 29, 2016, 03:00 AM IST

२०१६ या आर्थिक वर्षातील अखेरचे तीन महिने प्रचंड नाट्यमय आणि गोंधळाचे ठरले. त्याची सुरुवातच डिमॉनिटायझेशनने अर्थात नोटाबंदीने झाली आणि अखेर ‘दंगल’ने होत आहे.

 • article of parthivi joshi in divya marathi
  २०१६ या आर्थिक वर्षातील अखेरचे तीन महिने प्रचंड नाट्यमय आणि गोंधळाचे ठरले. त्याची सुरुवातच डिमॉनिटायझेशनने अर्थात नोटाबंदीने झाली आणि अखेर ‘दंगल’ने होत आहे. दोन्ही टोकांच्या अखेरीस ‘डी’आहे. या दोन्ही ‘डी’मध्ये प्रचंड जोखीम उचलत प्रवाहाविरुद्ध बंड पुकारून आपले स्वप्न साकार करण्याची शक्ती आहे. स्वप्न सत्यात उतरवण्याची महत्त्वाकांक्षा, त्यासाठी सामाजिक बंधने झुगारून आव्हानांचा सामना करणे, जिद्द, मेहनत आणि देशभक्तीच्या जोरावर लैंगिक भेदभावाला सामोरे जात ध्येय गाठणे, हे फोगट भगिनींचे साररूपी चरित्र.

  यशाच्या मार्गावर वाटचाल करताना स्वत:वर, संरक्षकांवर आणि आपल्या देशावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. तसेच इतरांवर प्रभाव पाडणे नव्हे, तर इतरांसाठी प्रेरणा बनणे हे आपले उद्दिष्ट हवे. यात दुहेरी दृष्टिकोन आहे. पालक मुलांसाठी आदर्श असावेत तसेच मुलांनीही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवले पाहिजे. आजची तरुण पिढी अत्यंत निराश आणि मोहमयी जगात वावरत असते. विदेशात जाऊन उच्चशिक्षण घेणे म्हणजे चांगले आयुष्य, हे समीकरण त्यांनी बनवले आहे. पालकांनीच भावी पिढीच्या मनात एक स्वप्न पेरून तसे वातावरण दिल्यास निश्चितच त्यांचे भवितव्य अधिक उज्ज्वल, समाधानी असेल. फोगट बहिणींच्या वडिलांनीही त्यांच्यासाठी मोठे स्वप्न पाहिले नसते , त्यासाठी एवढी मेहनत घेतली नसती तर आज त्या कुठे असत्या?

  एखाद्या गावात पुरेशा शैक्षणिक तसेच आर्थिक सोयीसुविधा नसतानाही तेथील लोक संपूर्ण देशासाठी प्रेरणा बनू शकतात, तर मग ते तितकेच नशीबवान का नाही बनू शकत? यासाठी आपल्याला एकच गोष्ट करावी लागेल. योग्य दिशेने ध्येय निश्चित करुन त्या दिशेने पाऊल उचलावे लागेल. तसेच निश्चित केलेले ध्येय गाठण्यासाठी कठोरात कठोर संघर्ष करण्याची तयारी हवी.
  पार्थिवी जोशी, २५
  नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन, गांधीनगर, गुजरात

Trending