Home | Mukt Vyaspith | article of prajakta bhawe on resolution

नव्या वर्षात असाही संकल्प करता येईल...

प्राजक्ता भावे | Update - Dec 31, 2016, 03:00 AM IST

२०१६ या वर्षखेरीस विमुद्रीकरणाच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडल्या. वैयक्तिक आयुष्यातही आपण काही गोष्टी गमावल्या असतील, तर काही गोष्टी कमावल्या असतील. देश या पातळीवरही आपण अनेक अनुभव घेतले.

  • article of prajakta bhawe on resolution
    २०१६ या वर्षखेरीस विमुद्रीकरणाच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडल्या. वैयक्तिक आयुष्यातही आपण काही गोष्टी गमावल्या असतील, तर काही गोष्टी कमावल्या असतील. देश या पातळीवरही आपण अनेक अनुभव घेतले. नव्या संकल्पांसह नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी आपल्यापैकी अनेक जण सज्जही असतील. अनेकांनी नव्या वर्षातील काही योजनांचाही विचार केला असेल. नव्या वर्षाच्या स्वागताला पुढील काही संकल्पांचाही विचार करता येईल. उपेक्षित, दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काय करता येईल, याचा विचार करू शकतो. या दोन्ही घटकांमधील अंतर कमी करण्यासाठी योग्य व्यासपीठावर मत व्यक्त करण्याची गरज आहे.
    नव्या वर्षात आपल्या वर्तमानातील क्षमतांपेक्षा अधिक काही करण्याचा संकल्प करू शकतो. इतरांना मदत करण्याचा विचार करू शकतो. उज्ज्वल भविष्यासाठी केवळ इतरांसाठी काम न करता इतरांसोबत काम करण्याचा अनुभवही घेऊ शकतो. केवळ जात, वर्ग, लैंगिक ओळख, धर्म, शैक्षणिक गुणवत्ता, पात्रता, वय, संस्कृती, वंश, जीवनशैलीचा फरक इत्यादी कारणांमुळे कित्येक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या घटकांचा आपण विचार केला पाहिजे. धार्मिक, लैंगिक किंवा जातीय हिंसाचाराच्या मुळाशी बहिष्कार आणि उदासीनता ही दोन मुख्य कारणे असतात. हे टाळून आपण शांतताप्रिय आणि आनंदी समाज स्थापन करू शकतो. शांतता आणि एकतेतून आपण अनेक प्रश्न मार्गी लावू शकतो. उदाहरणार्थ, अाण्विक युद्ध, जागतिक तापमानवाढ, अमर्याद वाढत जाणारी लोकसंख्या. आपापसातील शत्रुत्व, भेदभाव आणि उच्चनिचता विसरून एकमेकांसोबत काम केल्यास तसेच कुणासाठी काम करण्याऐवजी आपणा सर्वांसाठी काही केल्यास आपण अधिक चांगले जग निर्माण करू शकतो. नवे वर्ष तुमच्या आयुष्यात आनंद, शांतता आणि एकजूटता घेऊन येवो, हीच शुभेच्छा.
    प्राजक्ता भावे,
    टाटा इन्स्टिट्यूट अॉफ सोशल सायन्सेस, मुंबई

Trending