Home | Mukt Vyaspith | article of shaukat ali on dalit problem

सुशिक्षित समाजच राेखू शकताे दलितांचे शाेषण

शाैकत अली | Update - Dec 27, 2016, 03:00 AM IST

भारतातील अनुसूचित जाती अाणि जमातींच्या शाेषणाविषयी अालेल्या अहवालातून शासकीय व्यवस्थेचे अपयश उघड झाले अाहे.

  • article of shaukat ali on dalit problem
    भारतातील अनुसूचित जाती अाणि जमातींच्या शाेषणाविषयी अालेल्या अहवालातून शासकीय व्यवस्थेचे अपयश उघड झाले अाहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे लाेटली अाहेत; परंतु दलित अाणि शाेषितांवर हाेत असलेले अत्याचार काही कमी झालेले नाहीत किंवा ते पूर्ण रूपाने स्वतंत्र झाले नाहीत. दलितांच्या संरक्षणासाठी बनवण्यात अालेल्या कायद्यांची अंमलबजावणीही सक्षमपणे हाेत नाही, राजकीय हस्तक्षेपामुळे त्यांना न्याय मिळत नाही. दुसरीकडे केंद्र अाणि राज्य सरकारांकडून गठीत करण्यात अालेले अायाेग तसेच अन्य संस्थांची कार्यपद्धतीदेखील ढिसाळ असल्यामुळेच भारतीय राज्यव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले अाहे.

    दलितांना संरक्षण देण्याच्या नावाखाली अनेक कायदे अाणि संस्थांची निर्मिती करण्यात अाली खरी; मात्र याेग्य अजेंडा तथा समन्वयाच्या अभावामुळे त्यास दिशा मिळू शकली नाही. या अहवालावर सत्ताधारी अाणि विराेधी पक्षांची मंडळी वादविवाद करण्याशिवाय ठाेस काही करू शकणार नाहीत, चर्चेनंतर हा विषय जसाच्या तसा पडून राहील. अनुसूचित जाती अाणि जमातींच्या लाेकांमध्ये जागरूकता अाणण्यासाठी विनामूल्य कायदेविषयक मदत दिली तरच त्यांचे शाेषण राेखले जाऊ शकते. संविधानाच्या निर्मात्यांनी सामाजिक न्यायाची जी परिभाषा अाम्हाला दिली त्याच्या सार्थकतेवर संशय निर्माण हाेण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली अाहे. अाजही जिथे दलित बहुसंख्याक अाहेत तिथे शैक्षणिक सुविधा कमी अाहेत. तिथे साक्षरता वाढवण्यासाठी विशेष कार्यक्रम राबवावे लागतील, ज्यामुळे दलित वर्ग जागृत हाेईल. १९८९ च्या अनुसूचित जाती अाणि जमाती (अत्याचार निवारण) अधिनियमात एक विशेष दुरुस्ती करून त्याची राष्ट्रीय स्तरापासून ते स्थानिक पातळीपर्यंत सामान्य नागरिकांच्या सहयाेगाने यशस्वी अंमलबजावणी करण्याची खरी गरज अाहे; त्यावरील निरर्थक वादविवादाची नाही.
    शाैकत अली, १९
    राजस्थान विद्यालय, जयपूर.

Trending