आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Arvind Kejriwal, Divya Marathi, Samajwadi Party

केजरीवालांमुळे बंद होत आहे हवामान खाते...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

समाजवादी पक्षाचे कानपूरचे तिकीट नाकारून भाजपमध्ये सामील झालेले विनोदवीर राजू श्रीवास्तव यांनी मोठ्या नेत्यांवर केलेल्या काही कोट्या...
जेव्हा त्यांना विचारले गेले-
1. समाजवादी पक्ष सोडताना तुम्हाला मुलायम सिंह यादव यांनी थांबविले नाही का?
राजू- नेताजी म्हणाले, काही त्रास होता, तर मला सांगायचे होते. मी म्हणालो, की सांगितले होते. म्हणे अखिलेश यांनाही सांगायचे होते. मी म्हणालो, की त्यांनाही सांगितले होते. त्यावर रागाने पाहून म्हणाले, रामगोपालशी तर बोललेच नसाल. मी म्हणालो, की त्यांनाही सांगितले होते. त्यावर एवढेच म्हणाले, की मग काहीतरी गंभीर बाब असेल.
2. अडवाणीजी अचानक पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून बाहेर का पडले?
राजू- होय, मी विचारल्यावर एवढेच म्हणाले, ‘..इतरांमध्ये कुठे दम होता, मीच म्हातारपणात जोशात आलो होते, जो तारुण्यात थोडा कमी होता.’
3. मोदीजींना कधी भेटला आहात का?
राजू- मुलायम सिंहांसमोरच भेटलो होतो. ते नेताजींना म्हणत होते, की यूपीला तुम्ही गुजरात नाही बनवू शकत. कारण, त्यासाठी 56 इंचांची छाती पाहिजे. मी पाहिले, तेव्हा त्यांची छाती 70 इंच होती.
4. राहुलजींच्या विचारांबाबत काय म्हणाल?
राजू- राहुल मला एकदा म्हणाले होते, की काँग्रेसमध्ये आता भ्रष्टाचा-यांना आणि बिनकामाच्या लोकांना जागाच नाही. तेव्हा कोणीतरी मागून ओरडले, काय दादा, हाउसफुल आहे का?
5 ..आणि अरविंद केजरीवाल?
राजू- केजरीवालांमुळे तर हवामान खातेही हैराण झाले आहे. कार्यालयच बंद करण्याचा विचार ते करीत असल्याचेही समजले. कारण, लोक तर केजरीवालांना पाहूनच हवामानाचा अंदाज लावतात. मफल घट्ट बांधलेला असेल व त्यांना खोकला येत असेल, तर कडाक्याची थंडी पडली आहे. मफलर थोडा सैल असेल, तर हवामान सामान्य आहे. मफलर नसेल, तर मनमोकळे भटका, वॉटर पार्कची मजा घ्या...