आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात दंगलीचे शल्य...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अटलजींच्या मनाचा माेठेपणा अाणि समयसूचकता अशी की, त्यांनी अापली भूमिका बहुमताशी जुळवून घेतली. गाेव्यातील कार्यकारिणीच्या बैठकीनंतर सायंकाळच्या जाहीर सभेत तर त्यांनी एक प्रकारे माेदी यांचे समर्थन केले. ते म्हणाले, ‘भारत प्राचीन काळापासून सेक्युलर अाहे. अगदी इस्लाम व ख्रिस्ती धर्म इथे येण्याअाधीपासून. इस्लामची दाेन रूपे अाहेत. एक अाहे शांतिपाठ देणारा अाणि दुसरा मूलतत्त्ववादी व दहशतीला प्राेत्साहन देणारा. जेथे मुस्लिम बहुसंख्याक असतात तेथे ते शांततामय सहजीवन अशक्य करून टाकतात...’ हा अटलजींचा अवतार अगदी वेगळा हाेता. एकीकडे अटलजी मित्रपक्षांचा सेक्युलर दबाव झुगारत हाेते, त्याच वेळी नरेंद्र माेदी यांच्या राजीनाम्याचा प्रश्न संपल्याचे सूचित करत हाेते आणि स्वत:चे पक्षांतर्गत नेतृत्वही अधिक मजबूत करत हाेते. (पत्रकार सारंग दर्शने लिखित अाणि राजहंस प्रकाशित ‘अटलजी कविहृदयाच्या राष्ट्रनेत्याची चरितकहाणी’ या पुस्तकातून साभार)

 

अयाेध्येत कारसेवा अाणि पूर्णाहुती यज्ञ संपल्यानंतर सुमारे १,७०० कारसेवक साबरमती एक्स्प्रेसने अहमदाबादला परतत हाेते. त्यांची गाडी ४ तास विलंबाने सकाळी पावणेअाठला गाेध्रा स्थानकात पाेहाेचली. काही वेळ गाडी थांबली अाणि पुढे सरकली. ती जेमतेम एक किलाेमीटर गेली नसेल, ताेच पुन्हा थांबली. शेकडाे जणांचा रानटी जमाव ‘अल्लाहाे अकबर’च्या घाेषणा देत गाडीवर चालून येत हाेता. या राक्षसांनी एस-६ हा डबा बाहेरून बंद केला. खिडक्यांमधून अात पेट्राेल भरलेले कॅन रिते केले अाणि डबा पेटवून दिला. क्षणात कारसेवकांनी खच्चून भरलेला तो डबा धडाडून पेटला. जिथे रामधून चालू हाेती, तिथे अार्त किंकाळ्या सुरू झाल्या. फाळणीनंतर रेल्वेवर असा भयकारी जात्यंध हल्ला प्रथमच हाेत हाेता.

 

या वेळी रेल्वेच्या शेजारच्या मशिदीतून अाक्रमक घाेषणा एेकू येत हाेत्या. नरसंहार इतका भयानक हाेता की, ५९ कारसेवकांचा जागीच काेळसा झाला. शेकडाे कारसेवक भाजले. दुसऱ्याच दिवशी गुजरातमध्ये महाभयंकर दंगल पेटली. हिंदू अाक्रमक बनले हाेते. निरपराध मुस्लिमांच्या सरसकट कत्तली झाल्या. अहमदाबाद व इतर शहरांत लष्कर उतरले. अटलजी पंतप्रधान झाल्यापासून जे टळले हाेते तेच नेमके घडले. २८ फेब्रुवारीपासून ७ दिवस अनेक वसाहती जळत हाेत्या. सुमारे १,२०० लाेक बळी गेले. यात बहुसंख्य मुस्लिम हाेते. कायदा धाब्यावर बसवून संतप्त हिंदू गाेध्राचा रक्तबंबाळ सूड घेत हाेते. विश्व हिंदू परिषदेने २८ फेब्रुवारीला गुजरात बंदचा नारा दिला. इतर व्यवहार बंद राहिले; पण जाळपाेळ व दंगे मात्र चालू राहिले.

 

‘मुख्यमंत्री म्हणून माेदींनी दंगल शमवली नाही, उलट अप्रत्यक्ष साथ दिली’, असे अाराेप हाेऊ लागले. अटलजींच्या कानावरही ते पडत हाेते. त्यांच्या मनाची घालमेल हाेऊ लागली. पुढच्या विजय-पराजयाचे साेडा, पण हा रालाेअा राजवटीवरचा काळा डाग हाेता. ‘माेदी सरकार बडतर्फ करा’, अशी मागणी विराेधकच नव्हे, तर काही मित्रपक्षही करू लागले. ते शक्य नव्हते. अहमदाबादमध्ये नराेदा पाटिया येथे ९७, तर गुलबर्ग साेसायटीत ७० मुस्लिम ठार झाले. बडाेद्यात बेस्ट बेकरीत १४ जण मारेकऱ्यांच्या तावडीत सापडले. मेहसाणा जिल्ह्यात सरदारपुरा येते ३३ मुस्लिमांना जिवंत जाळण्यात अाले. या वार्ता एेकून विषण्ण झालेल्या अटलजींनी दूत म्हणून जाॅर्जना अहमदाबादला पाठवले.

 

मुख्यमंत्री माेदी २८ फेब्रुवारीलाच ‘दूरदर्शन’वर अाले हाेते. ‘गाेध्रा हत्याकांड अमानुष असले तरी त्यातील गुन्हेगारांना कायद्याच्या चाैकटीत शिक्षा व्हायला हवी अाणि या घटनेचा सूड इतरत्र घेता कामा नये’, असे अावाहन त्यांनी केले हाेते. तरी दंगलखाेर एेकण्याच्या बिलकुल मन:स्थितीत नव्हते. या दंगलीचे जगभर अाणि विशेषत: मुस्लिम मित्र देशांत काय पडसाद उमटतील, याचा अटलजींना घाेर लागला. त्यातच राष्ट्रपती नारायणन त्यांना लागाेपाठ नाराजीपत्रे लिहीत हाेते. अटलजी राेज माेदींशी फाेनवर बाेलत हाेतेच; पण या संवादातून त्यांना पुरेसा दिलासा मिळत नव्हता. संघ परिवारातील संघटनांचे सदस्य तसेच काही राजकीय कार्यकर्ते या दंगलीत सशस्त्र उतरले हाेते. अनेक ठिकाणी नामचीन गुंड अाणि गुन्हेगारांना दाेन्ही बाजूंकडून जाळपाेळीच्या सुपाऱ्या देण्यात अाल्या हाेत्या.

 

मासूम बच्चाें,
बुढी अाैरताें,
जवान मर्दाें,
की लाशाें के ढेर पर चढकर
जाे सत्ता के सिंहासन तक पहुँचना चाहते हैं
उनसे मेरा एक सवाल है :
क्या मरने वालाें के साथ,
उनका काेई रिश्ता न था?
न सही धर्म का नाता,
क्या धरती का भी सम्बन्ध नहीं था?
अशी ‘सत्ता’ नावाची कविता कविराय अटलजींनी मागेच लिहिली हाेती. पण पंतप्रधान अटलजींना या कवितेतील प्रश्नांची उत्तरे देता येत नव्हती. मनातील उत्तरे प्रत्यक्षात अाणता येत नव्हती. नेत्यासमाेर कवीला निमूट मन मिटून शांत बसावे लागत हाेते.

 

१५ मार्चपासून विश्व हिंदू परिषदेने राम मंदिराचे बांधकाम सुरू करण्याचा घाट घातला हाेता. या दंगलीनंतर ताे थाेडा साैम्य करून देशभरातून अालेल्या शिला सरकारच्या हाती साेपवण्यात अाल्या. हा दिलासा हाेता, तरी दाेन महिन्यांनी परिषदेने वादग्रस्त भूमी अामच्या ताब्यात द्या, अशी मागणी पुन्हा सरकारकडे केलीच.


अटलजी ४ एप्रिल २००२ राेजी अहमदाबादला अाले. तसा उशीर झाला हाेता. दंगलग्रस्तांच्या छावण्यांमधील अनाथ मुले पाहून ते हेलावले. म्हणाले, ‘विदेशाें में हिंदुस्थान की बहुत इज्जत है। उसमें मुस्लिम देश भी शामिल हैं। अब मैं वहाँ काैनसा मुँह लेकर जाऊँगा?’ त्या वेळी त्यांनी गाेध्रा हत्याकांडाचे वर्णन ‘एक साेची समझी साजिश’ असे केले. दंगलीचा निषेध करणारे बरेच ‘सेक्युलर’ हे मात्र स्पष्ट म्हणत नव्हते! गाेध्रा हत्याकांड झाले नसते, तर पुढचा अनर्थ टळला असता, हे अटलजींचे म्हणणे यथार्थ हाेते. दिवसभर भळभळत्या वेदनांच्या उग्र शाेककथा ऐकून सायंकाळी म्लान मनाने अाणि मुद्रेने अटलजी पत्रकारांना सामाेरे गेले. सर्वात महत्त्वाचा प्रश्न हाेता, ‘प्रधानमंत्रीजी, मुख्यमंत्री के लिए अापका क्या संदेश हैं?’ अटलजी म्हणाले, ‘एकही संदेश है कि वे राजधर्म का पालन करें। राजधर्म यह शब्द काफी सार्थक हैं। शासक के लिए प्रजा-प्रजा में भेदभाव नहीं हाे सकता। न जन्म के अाधार पर, न जाति के अाधार पर, न धर्म-संप्रदाय के अाधार पर।’ अटलजींचे हे वाक्य पुरे हाेताक्षणी शेजारी बसलेले मुख्यमंत्री माेदी म्हणाले,‘हम भी वहीं कर रहे हैं साहब...’ अटलजींनी हलका विश्राम घेतला अाणि काहीसा सूर बदलून ते म्हणाले, ‘मुझे विश्वास है कि नरेंद्रभाई यहीं कर रहे हैं।’ अाधीच्या उत्तराचा परिणाम उणावणारा हा खुलासा हाेता. अनुभवी अटलजींनी मग ‘बहुत बहुत धन्यवाद...’ म्हणत पत्रकार परिषद तेथेच संपवून टाकली.

 

या दंगलीनंतर माेदींनी स्वत:हून राजीनामा द्यावा किंवा निदान पक्षाने तरी त्यांना जायला सांगावे, असे अटलजींचे मत हाेते. ज्येष्ठ पक्षनेते तसेच भाजप व संघातील दुवा असणारे मदनदास देवी यांच्या अनेक बैठका झाल्या. अडवाणी, कुशाभाऊ ठाकरे यांना तसेच संघधुरिणांना माेदींनी राजीनामा देण्याचे काहीच कारण नाही, असे वाटत हाेते. अाश्चर्य म्हणजे रालाेअाचे निमंत्रक अाणि चाैकशीनंतर पुन्हा संरक्षणमंत्री झालेले जाॅर्जही ‘माेदींनी राजीनामा द्यायची गरज नाही’, असे म्हणू लागले. यानंतर लगेच एप्रिलच्या दुसऱ्या अाठवड्यात पणजीत भाजप कार्यकारिणीची बैठक हाेती. तेव्हा ‘माेदींनी निदान राजीनामा देण्याची तयारी दाखवली पाहिजे’, अशी अटलजींची अपेक्षा हाेती. १२ एप्रिल २००२ राेजी सकाळी पंतप्रधानांच्या खास विमानातून अटलजींसाेबत अडवाणी, जसवंतसिंह, अरुण शाैरी, ब्रजेश मिश्र हे पणजीकडे निघाले. या प्रवासात अटलजी व अडवाणी समाेरासमाेर बसले खरे, पण परस्परांशी बाेलले नाहीत. त्यांना एकमेकांच्या भूमिका माहीत हाेत्या. शेवटी शाैरींनी अटलजींच्या हातातले वृत्तपत्र हलकेच दूर करून ‘तुम्ही दाेघांनी गुजरातप्रश्नी काय ते बाेलायला हवे...’ असे सुचवले. त्यानंतर अटलजींनी गुजरात का क्या करना हैं? हमें गुजरात के बारे में साेचना चाहिए...’ अशी माेघम प्रस्तावना केली. यानंतर अडवाणी उठून काही वेळ विमानातील मागच्या बाजूला गेले तेव्हा अटलजींनी ‘माेदी काे कम से कम इस्तीफा अाॅफर ताे करना चाहिए। उनसे (अडवाणीजी से) पूछिए कि क्या करना हैं?’ असा निराेप जसवंतसिंह यांच्यासाेबत दिला. ताे अडवाणींनी एेकला अाणि ‘बवाल खडा हाे जायेगा पार्टी में..’ अशी भीती बाेलून दाखवली.

 

विमान गाेव्यात उतरले तेव्हाही हा प्रश्न पुरेसा सुटला नव्हता. मात्र, अडवाणी माेदींशी बाेलतील व माेदी विस्तारित कार्यकारिणीत राजीनाम्याची तयारी दाखवतील, असे ठरले. बैठक सुरू झाली. व्यासपीठावर अटलजी, अडवाणी, पक्षाध्यक्ष जन कृष्णमूर्ती व इतर ज्येष्ठ नेते हाेते. या वेळी नरेंद्र माेदी उठले अाणि त्यांनी गाेध्रा हत्याकांड व त्यानंतर उसळलेल्या दंगली यावर सविस्तर निवेदन केले. सरकारची बाजू मांडली. भाषण संपवताना माेदी म्हणाले, ‘हा जाे हिंसाचार झाला, त्याची नैतिक जबाबदारी घेऊन मी राजीनामा द्यायला तयार अाहे,’ त्यांचे हे वाक्य पुरे हाेण्याच्या अातच मंडपात ‘इस्तीफा मत दाे, इस्तीफा मत दाे..’ अशा जाेरदार घाेषणा सुरू झाल्या. हा वाढता अावाज अटलजींना खिन्न करणारा हाेता. त्यातच माेदी यांनी राजीनामा देण्याची अावश्यकता नाही, असा ठराव जेटली यांनी मांडला. प्रमाेद महाजन व सरचिटणीस संजय जाेशी यांनी त्याचे समर्थन केले. सभागृहाने एकमुखाने हा ठराव उचलून धरला. या घटनाक्रमाचा मूक साक्षीदार हाेण्यापासून अटलजींकडे पर्याय नव्हता. गुजरातच्या मुद्द्यावर पक्षात ते अल्पमतात हाेते. मात्र, अापल्याला अंधारात ठेवून या प्रस्तावाचा घाट घातला गेला, ही वेदना अटलजींच्या मनातून कधीही गेली नाही. अडवाणी व त्यांच्या तरुण तुर्कांनी अापल्याला जाहीरपणे एकटे पाडले, हे ते दु:ख हाेते. कार्यकारिणीने माेदींना राज्यात निवडणुका मात्र लवकर घेण्याचा अादेश दिला. (माेदींनी मग गुजरात गाैरव यात्रा काढली. डिसेंबरमध्ये १८२ सदस्यांच्या विधानसभेत १२६ जागा जिंकून दाेनतृतीयांश बहुमत मिळवून दाखवले. २२ डिसेंबर २००२ राेजी माेदींनी दुसऱ्यांदा शपथ घेतली तेव्हा अटलजी हजर राहिले. पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला हजर राहण्याचा हा पहिलाच प्रसंग.)


अटलजींच्या मनाचा माेठेपणा अाणि समयसूचकता अशी की, त्यांनी अापली भूमिका बहुमताशी जुळवून घेतली. गाेव्यातील कार्यकारिणीच्या बैठकीनंतर सायंकाळच्या जाहीर सभेत तर त्यांनी एक प्रकारे माेदी यांचे समर्थन केले. ते म्हणाले, ‘भारत प्राचीन काळापासून सेक्युलर अाहे. अगदी इस्लाम व ख्रिस्ती धर्म इथे येण्याअाधीपासून. इस्लामची दाेन रूपे अाहेत. एक अाहे शांतिपाठ देणारा अाणि दुसरा मूलतत्त्ववादी व दहशतीला प्राेत्साहन देणारा. जेथे मुस्लिम बहुसंख्याक असतात, तेथे ते शांततामय सहजीवन अशक्य करून टाकतात..’ हा अटलजींचा अवतार अगदी वेगळा हाेता. एकीकडे अटलजी मित्रपक्षांचा सेक्युलर दबाव झुगारत हाेते, तिसरीकडे नरेंद्र माेदी यांच्या राजीनाम्याचा प्रश्न संपल्याचे सूचित करत हाेते, तर चाैथीकडे स्वत:चे पक्षांतर्गत नेतृत्वही अधिक मजबूत करत हाेते. अटलजींच्या या वक्तव्याने बिथरलेल्या माध्यमांना जेटली यांनी ताेंड दिले. ‘हिंदूंमधील कडवेपणाचा धिक्कार केला की अटलजींना उचलून धरले जाते अाणि तेच अटलजी मुस्लिम दहशतवादावर बाेलले की, टीकेचे धनी हाेतात, हे कसे काय?’ हा जेटली यांचा सवाल केवळ वकिली नव्हता, तर ढाेंगीपणावर नेमके बाेट ठेवणारा हाेता. गाेव्यात दाेन गाेष्टी झाल्या. पहिली नरेंद्र माेदी यांच्या पक्षांतर्गत नेतृत्वाचा स्पष्ट उदय अाणि अडवाणींनी मुंबईत अटलजींच्या नेतृत्वाची घाेषणा केल्यापासून काही काळ मागे पडलेल्या हिंदुत्वाचा नवा जाेरदार प्रवेश! या प्रवेशाचे प्रत्यंतर भाजपने पराभवाच्या छायेत गेलेला गुजरात मुदतपूर्व निवडणुकीत जिंकून घेतला, तेव्हा अालेच. पुढे माेदींनी गुजरातमधील विजयाची ही परंपरा अनेकवार टिकवून ठेवली.

 

हे गुजरात प्रकरण अटलजींना शेवटपर्यंत भाेवले. सतत टीका हाेत राहिली. त्यांच्या राजवटीत जातीय दंगली टळल्या हाेत्या. गुजरातने ताे लाैकिक धुळीला मिळवला. विराेधकांशी असणारा संवादही कडवट झाला. नव्या राष्ट्रपतींच्या निवडीवर या दुराव्याची सावली पडली. दंगलीनंतरचे कवित्व सुरू असतानाच एक दिवस काँग्रेस अध्यक्षा साेनिया गांधी यांनी अटलजींची भेट मागितली. ऋजू स्वभावाच्या अटलजींनी त्वरित वेळ दिली. ‘डाॅ. पी. सी. अलेक्झांडर हे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून अाम्हाला नकाेत’, हे सांगण्यासाठी साेनिया अाल्या. हा धक्का हाेता. एक तर अलेक्झांडर मुळात गांधी घराण्याचे निष्ठावंत हाेते. त्यांना राष्ट्रपती हाेण्याची अाकांक्षा हाेती. अटलजीही अनुकूल हाेते. संघ परिवाराच्या बाहेरची व्यक्ती, ख्रिश्चन समाजाचा प्रतिनिधी अाणि मूळ केरळ म्हणजे दक्षिण भारतातील रहिवासी अशी त्रिगुणी संपदा अलेक्झांडर यांच्या ठायी हाेती. ते निष्कलंक व निर्भीड प्रशासक हाेते. अाता काँग्रेसइतकेच भाजप व शिवसेनेच्याही जवळ अाले हाेते.      

 

 

बातम्या आणखी आहेत...