आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्मविश्वास वाढवणारे पोशाखच लोकप्रिय (अस्मिता अग्रवाल)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फॅशन जगतात १० वर्षांपूर्वी डिझायनर अनुपमा दयाल यांनी पाऊल ठेवले. आज सुंदर पोशाखांच्या दुनियेत त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. या दशकभराच्या वाटचालीला त्या आनंदाचा प्रवास म्हणतात. नुकताच त्यांच्याशी संवाद साधला. येणारा प्रत्येक दिवस आपल्यासाठी वरदान असतो, असे त्या मानतात. आपण स्वावलंबी आहोत आणि कुटुंबाला चांगले आयुष्य देण्यात यशस्वी झालो आहोत हा सर्वात मोठा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. जगभरातील महिलांकडून मिळणारे प्रेम आणि सन्मान माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे अाहे. काळ बदलेल, मात्र आपण जसे आहोत तसेच राहू. पर्यावरणाविषयी त्यांना विशेष आस्था आहे. फॅशनला त्या परिवर्तनाच्या साधनाप्रमाणे वापरतात. आत्मविश्वासाची उणीव माझ्यात कधीही भासणार नाही. याच बळावर आपण प्रवास करत असल्याचे त्यांनी सांगितले.
बोहेमियन स्टाइल, बंगाली मूळ आणि भारताचा संपन्न वारसा याला त्या आपले प्रेरणास्रोत मानतात. फॅशनला कधीही बंधनात ठेवता येत नाही, असे त्यांचे मत आहे. पोशाखांसोबतच गृहसजावट, इतर साजसजावट आणि दागिन्यांवरही त्या विविध प्रयोग करतात. कपड्यांना डिझाइन करण्याइतकीच मौज त्यांना या इतर डिझायनिंगमध्येही वाटते. विविध वस्तूंवर प्रयोग करण्याची त्यांना आवड आहे.
अनुपमा कपडे डिझाइन करताना एका मूलभूत बाबीवर विशेष भर देतात. ‘हॅपी क्लोदिंग’ही त्यांची मध्यवर्ती कल्पना असते. प्रत्येक प्रकारच्या महिलांसाठी त्या डिझायनिंग करतात. त्या रंगासोबत फार सुरेख ढंगात खेळतात, अशी त्यांची ख्याती आहे. महिलांना त्यांचे हेच कसब आवडते. फॅशनमध्ये सातत्याने होणारे बदल त्यांना अधिक आकर्षित करतात. महिलांना स्वत:ची परिपूर्ण अभिव्यक्ती आणि साैंदर्यासह जगासमोर येणे आवडते. कपडेही याचाच एक भाग असून याच भूमिकेतून आपण काम करतो, असे अनुपमा सांगतात. महिलांच्या या इच्छेला पूर्ण करण्यासाठी आपण हे काम करतो.
काही महिन्यांपूर्वी अनुपमा नागालँडला गेल्या होत्या. तेथील आदिवासींशी मैत्री करण्याची संधी त्यांना मिळाली. तेथील कपड्यांचे पोत, टोपल्या बनवण्याची कला, दागिने, हत्यारे इत्यादींनी मनात घर केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचे कलेक्शन ‘फाइट अँड फिस्ट’ नागा समाजाने प्रेरित आहे. हीच श्रेणी अॅमेझॉन इंडिया फॅशन वीक-२०१६ मध्ये सादर झाली होती. अनुपमा यांचे भारतीय ढब आणि वस्त्रशैलीशी घट्ट नाते असून सलवार-कमीज त्यांचा आवडीचा पोशाख आहे. सलवार-कमीजवर त्या सातत्याने नवनवे प्रयोग करत असतात. थंडीच्या दिवसांतही हा ड्रेस सहजरीत्या वापरात यावा यासाठी गडद रंगांचा वापर आणि लेअरिंग करण्यात आले. फॅशन एक कथा एेकवल्याप्रमाणे आहे. याच आधारे त्यांनी शरद वस्त्रश्रेणी डिझाइन केली. त्यांचे म्हणणे आहे की भारतीय असल्याने आपल्याला पाश्चात्त्य दिसण्याची आेढ असते. इतर देशांतील लोकांना आपला लूक, ड्रेस, परंपरा, खानपान, धर्म इत्यादी वेगळे वाटते. त्यांच्या पूर्ण श्रेणीमध्ये नागालँड आणि तेथे राहणाऱ्यांच्या कथा ऐकण्यास मिळतील.
बातम्या आणखी आहेत...