आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुजबूज: सुनेचे गीत नेताजीच्या प्रचारातून हद्दपार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन महिन्यांपूर्वी सैफेई महोत्सवात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सावत्र भाऊ प्रतीक यांची पत्नी अपर्णाचा एक म्युझिक अल्बम रिलीज केला होता. हिंदी चित्रपटांचे प्रसिद्ध संगीत द्ग्दिर्शक साजेद-वाजेदने संगीत दिलेल्या या अल्बम अपर्णाने श्वसूर मुलायमसिंह यांचे कौतुक केले होते. त्यांना पुढचे पंतप्रधान म्हटले होते. मात्र हे सारे व्यर्थ राहिले. आझमगडमधून प्रतीकला तिकीट देणे तर लांबच, अपर्णाच्या या अल्बमला प्रचारापासून दूरच ठेवले जात आहे. त्यांच्या पक्षात कुटुंबीयांना तर उच्च पदे देण्यात आली आहेत. मग प्रतीकशी असा व्यवहार का? म्हणजे नेताजींच्या घरात सगळे काही आलबेल नाही. कोण जाणे, अखिलेशची नजर वाकडी तर नाही ना झाली?


आधी बहिणी, मग सवती, आता विरोधी पक्षांत
खगरियाचे माजी आमदार रणवीर यादव विचित्र पेचात सापडले आहेत. त्यांची पत्नी कृष्णाकुमारी यादवला राष्ट्रीय जनता दलाने याच मतदारसंघातून तिकीट दिले आहे. कृष्णाकुमारी रणवीर यांची दुसरी पत्नी आहे. कृष्णाची मोठी बहीण पूनम यांचेही लग्न रणवीरशी झाले आहे. पूनम खगरियामधून जनता दल (संयुक्त)च्या आमदार आहेत. रणवीरसोबतच राहतात. म्हणजे तिघे एकाच छताखाली. नीतीशकुमार यांचे कट्टर समर्थक रणवीर यांची अडचण आहे की, या समस्येला कसे तोंड द्यावे. दोन बायका, दोन वेगवेगळ्या पक्षात आहेत. कोणाचा प्रचार करायचा आणि कोणाचा नाही करायचा?