आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुजबूज : वृत्तपत्र मालकाने ओडिशाची निवडणूक बनवली चौरंगी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘खींचो न कमान, न तलवार निकालो; जब तोप मुकाबिल हो तो अखबार निकालो...’ या प्रसिद्ध शेरमध्ये आता आणखी एक ओळ जोडली जाऊ शकते. ‘..और जब अखबार मुकाबिल हो तो चुनाव लड लो!’ यंदा निवडणुकीत लढणा-यांमध्ये पत्रकारांची संख्या बरीच मोठी असल्याचे दिसते. ताजी घटना ओडिशातील सर्वाधिक खपाच्या उडिया दैनिकाचे मालक-संपादक सौम्य रंजन पटनायक यांची आहे. त्यांनी अमा ओडिश पार्टी हा स्वत:चा पक्ष काढला. भाजपतून बाहेर पडलेले तीन वेळा खासदार राहिलेले माजी आयएएस अधिकारी खारबाला स्वेन यांना त्यांनी सोबत घेतले आहे. दोघेही भाजपशी आघाडी करू इच्छित होते; पण तसे होऊ शकले नाही. आता ते ओडिशामध्ये बीजेडी-काँग्रेस-भाजपच्या विरोधातील मुकाबला चौरंगी बनवण्याच्या तयारीत आहेत. तसेही ओडिशात अनेक वृत्तपत्रांचे मालक खासदार-नेते आहेत. पटनायकदेखील संसदेत पोहोचू शकतील?