आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुजबूज: भोपाळमध्ये मुलीसाठीसुद्धा जागा बनली असती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लालकृष्ण अडवाणी यांच्या भाजपवर नाराज होण्याचे खरे कारण हे त्यांचा मुलीसाठीचा आग्रह आहे. ते आपल्यानंतर आपली मुलगी प्रतिभा अडवाणी यांना निवडणूक रिंगणात लढवू इच्छितात. आपल्यानंतर गांधीनगरमधून मुलगी प्रतिभाला तिकिट मिळेलच याची अजिबात खात्री त्यांना वाटत नाही. याउलट मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहाण यांनी अडवाणींना शब्द दिला आहे की, त्यांच्यानंतर प्रतिभा यांनाच ते भोपाळमधून तिकिट देतील. नाराजीचे आणखी एक प्रमुख कारण म्हणजे, पक्षाचे वरिष्ठ नेते असूनही अडवाणींना पाचव्या यादीपर्यंत वाट पाहावी लागली. परंतू मोदींनी गांधीनगरची घोषणा ही गुजरातमधील अन्य जागांप्रमाणेच होईल, असे सांगून रोखले होते. निवडणूक समितीत असूनही अडवाणी काहीच करू शकले नाही.


पुढे वाचा महाराष्ट्रात दलित विरुद्ध दलित, सर्वांचेच झेंडे निळे......