आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Lalkrishna Advani And Murli Manohar Joshi, Divya Marathi

सुखाचे दिवस सरले, आता...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुरली मनोहर जोशी.. लालजी टंडन.. मग अडवाणी आणि आता जसवंतसिंह. सक्रिय राजकारणात ज्या वेगाने यांचे वजन घटवण्यात येत आहे, त्यामुळे भाजपमध्ये पंचाहत्तरी ओलांडणा-या नेत्यांना हद्दपार करण्याची योजना सुरू आहे का, असा सवाल उपस्थित होतो.


अडवाणी - 86 वर्षे
अशा प्रकारे केले जातेय बेदखल
1. मोदींना राष्ट्रीय कार्यसमितीत सहभागी करून घेऊ नये असे त्यांना वाटत होते. तसे करावेच लागले तर शिवराज यांनाही घ्यावे ही अट होती. पण केवळ मोदींनाच स्थान दिले.
2. मोदींना निवडणूक प्रचारप्रमुख बनवू नये अशी त्यांची इच्छा होती. पक्ष सोडण्याची धमकीही दिली होती. पण गोव्यात नावावर शिक्कामोर्तब झाले. अडवाणींनी राजीनामे दिले. पुन्हा राजी झाले.
3. निवडणुकीआधी मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवायचे नव्हते. काँग्रेसच्या विरोधातील वातावरण खराब होईल, असे मत मांडले. पण येथेही सल्ल्याकडे दुर्लक्षच झाले.
4. गांधीनगरमधून निवडणूक लढवण्याची इच्छा होती. पण 4 याद्यांतही नाव आले नाही. भोपाळसाठी तयार झाले तर पक्षाने नकार दिला. अखेर हार मानली आणि गांधीनगरच निश्चित झाले.

काही आठवणी...
अटलजींच्या काळातही पक्षात अडवाणींचा शब्द चालायचा. त्यांच्या मर्जीशिवाय कोणालाही काहीही करता येत नव्हते. पक्षावर त्यांचे नियंत्रण होते.
ऑफ द रेकॉर्ड - नाराज असणा-या मोदींच्या गटाला असा संशय आहे की, अडवाणी पडद्यामागे मोदींविरोधात कारवाया करत आहेत.
मोदींमुळे सगळ्यांचाच सन्मान हिरावला गेला
अडवाणींना ज्या प्रकारे वागणूक दिली जात आहे, त्यानुसार कोणालाही सन्मान मिळणार नाही अशी शक्यता आहे. जे वरिष्ठांचा सन्मान करू शकत नाहीत, ते देशाचा सन्मान कसा करणार? - रामगोपाल यादव, सपा


एम. एम. जोशी- 80 वर्षे
1. मुरली मनोहर जोशी यांना वाराणसीमधूनच लढायचे होते; पण मोदींच्या आग्रहामुळे वाराणसी सोडावे लागले.
2. जोशींना कानपूरमध्ये पाठवण्यात आले आहे. ही जागा त्यांच्यासाठी धोकादायक आहे. पराभव झाल्यास राजकारणच संपेल अन् जिंकल्यास मोदी लाटेला क्रेडिट.
संघाशी दुरावा असण्याचे कारण - 2004 मध्ये अलाहाबादमधून पराभव. 2004 मध्ये काशीमधून विजय. जिना प्रकरणात संघाचा विरोध पत्करून अडवाणींना समर्थन दिले.
आठवणी : अटल-अडवाणी यांच्यानंतर तिस-या क्रमांकाचे नेते. राष्ट्रीय अध्यक्षही होते. एकेकाळी संघाचे सर्वाधिक लोकप्रिय.
मोदी इतके घाबरट आहेत की, जोशींचाही अपमान करत आहेत. त्यांच्या जागेवरही कब्जा केला. मोदी असेच आहेत. ते सर्वांनाच प्रवाहातून बाहेर काढतील.
- अर्जुन मोढवाडिया, काँग्रेस


जसवंतसिंह
76 वर्षे

बाडमेरमधून उमेदवारी हवी आहे; पण मिळत नाही. तिकीट दिले नाही तर अपक्ष लढण्याची धमकी दिल्याची चर्चा आहे.
आठवणी : सर्वात कडवे नेते. पक्षात एवढे वजन होते की, अटलजी त्यांना त्यांचे हनुमान म्हणायचे.
जिनांची स्तुती करून पक्षातून निलंबितही झाले होते. परतले, पण नेतृत्वावर नाराजच आहेत. केंद्रात मोदी व राज्यात वसुंधरा यांना विरोध. संघाच्या अजेंड्यातही बसत नाहीत. त्यामुळे निवृत्तांच्या यादीत नाव.


लालजी टंडन
79 वर्षे

लखनऊमधून तिकीट रद्द करून निवृत्तीवर शिक्कामोर्तब. राज्यसभेत पाठवण्याचे आश्वासन.
1976 । इंदिराही इंडिया, इंडियाही इंदिरा.
- देवकांत बरुआ यांचा नारा.
2014 । मोदीही भाजप, भाजपही मोदी
- कल्याणसिंह यांचे वक्तव्य
सोशल मीडियावरील विविध मते
भाजपला 2 जागांवरून 180 वर आणले; पण आज पक्ष आवडीची एकत जागाही सोडत नाही. - गौतम सिद्धवाणी, भोपाळ
या वयामध्ये सत्तेची लालसा चांगली नाही. नेत्यांनीच विचार करावा.
- दीप्ती पाटील
अडवाणींनी आता निवृत्त व्हायला हवे. उर्वरित आयुष्य रामनामासाठी अर्पण करावे. - मनीष कुमार
पेराल तेच उगवते’ ही म्हण अडवाणी विसरलेत का?
- सिद्धार्थ चौधरी, रोहतक


मोठे आहात, मोठेपणा दाखवा.. जोशींचा तरी आदर्श ठेवा
अडवाणी ज्येष्ठ आहेत. त्यांनी मोठेपणा दाखवायला हवा होता. पक्षालाच झुकवण्याचा हट्ट कशासाठी? ज्याप्रकारे जोशी तयार झाले, तसे केले असते तर मान अधिक वाढला असता. -गोविंद शर्मा, उदयपूर