आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान तर उत्तर प्रदेशच देतो, याही वेळी ‘देणार’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सियालदाह एक्स्प्रेसमधून
रेल्वेत बसताच मी विचारले की, वातावरण कसे आहे? यंदा कोण जिंकणार? प्रश्न संपलेच नव्हते की समोरून रामसुमेर मिश्रा यांच्याकडून उत्तर आले. म्हणाले, ‘देशाला नेहमी उत्तर प्रदेशच पंतप्रधान देत असतो. या वर्षीसुद्धा येथूनच मिळेल. काँग्रेस जिंकल्यास पप्पू, भाजप जिंकल्यास फेकू आणि तिसरी आघाडी आली तर नेताजी.’ ते ज्याप्रमाणे हे उत्तर देत होते त्यावरून वाटले की, जणू हेच देशाच्या राजकारणाचे खरे सूत्रधार असतील. पुढे म्हणाले की, ‘आमचा जन्म नखलऊत झाला आहे. आम्ही पक्के यूपीवाले आहोत. देशाला यूपीच नेहमी पंतप्रधान देतो, हे येथील बालकही जाणते.’ (यूपीचे लोक लखनऊला नखलऊ म्हणतात.) संपूर्ण चर्चेदरम्यान रामसुमेर मिश्रा यांचा अहंकार शिखरावर होता. बोलता बोलता त्यांनीच प्रश्न केला की, असे नसते तर मोदींना येथून लढण्याची काय गरज होती? मोदींचे नाव निघताच अन्य मंडळीही निवडणुकीच्या या गप्पांमध्ये सामील झाली. दरम्यान, कृपाशंकर श्रीवास्तव यांनी आपला मुद्दा मांडला. भाजपने निवडणूक जिंकली, तरी मोदी पंतप्रधान बनू शकणार नाहीत, कारण राजनाथसिंह लखनऊत आपली डाळ शिजवण्यासाठी येणार आहेत. येथून लढलो, तर वाजपेयी बनून जाऊ, असे राजनाथसिंह यांना वाटते, असे मत श्रीवास्तव यांनी व्यक्त केले. तितक्यात ही संपूर्ण चर्चा शांतपणे ऐकत बसलेले अब्बास साहेब आक्रमक झाले. ‘सर्व राहू द्या हो बाजूला, राजनाथसिंह यांनी शंभरदा जन्म घेतला, तरी ते वाजपेयी बनू शकणार नाहीत. वाजपेयी यांना प्रत्येक धर्म, पक्षांचे लोक मानत होते आणि मोदींबद्दल फक्त देखावा निर्माण केला जातोय,’ असे त्यांनी सुनावले. दरम्यान, त्यांच्याच बाजूने एक जण आक्रमक होऊन म्हणू लागले की, तुम्ही या लाटेला देखावा कसे काय म्हणू शकता? त्यावर लगेचच अब्बास साहेबांकडून उत्तर आले, मोदी कधीच जिंकू नये, असे आम्हाला वाटते. बोलता बोलता अचानक मोबाइलवर व्हॉट्सअ‍ॅप मॅसेजमध्ये मग्न झाले. ते वाचत असलेल्या मॅसेजमध्ये मोदींना मत का देऊ नये, याविषयी लिहिले होते. हा मॅसेज सर्व मुस्लिमांच्या फोनवर फिरत असल्याचा दावाही त्यांनी केला. या मुद्द्यावर रेल्वे कर्मचा-यांचे नेते हरिमोहन शुक्लासुद्धा अब्बास साहेबांची बाजू घेत म्हणाले की, ‘बीजेपीने फक्त एक टक्के डीए दिला होता. काँग्रेसने तो 100 टक्के करून टाकला. त्यामुळे केंद्रीय कर्मचारी काँग्रेसला डोळे लावून मत देतील. सध्या आपण प्रवास करत असलेल्या ट्रेनचा सर्वात पुढचा डब्बा हा लष्करासाठी राखीव आहे आणि ते फक्त काँग्रेसमुळेच शक्य झाले आहे.’ शुक्लांच्या या स्पष्टीकरणावर मलिहाबादमध्ये राहणारे नायब सुभेदार रणदीप वर्मा यांनी स्मितहास्य केले. तेवढ्यात मी वर्मा यांनाच विचारले की, तुम्हीसुद्धा काँग्रेसच्या बाजूने आहात, तुम्हाला यावर काय वाटते? ते म्हणाले, काँग्रेसने एक रँक पेन्शन स्कीम दिली. त्याचा फायदा सैनिकांना होणार आहे. नाही तर आमचे मत तर सपालाच जाते. नेताजी हे आमच्या राज्यातले आहेत.
फैजाबादचे मुश्ताक यांनीसुद्धा मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या दावेदारीला विरोध केला. आक्रमक होत त्यांनी प्रतिक्रिया दिली. म्हणाले, ‘चोराच्या हाती चावी दिल्यास चोरीच होणार नाही. मोदी पंतप्रधान झाले, तर दंगलीच होणार नाहीत.’ मुजफ्फरनगर दंगलीमुळे काँग्रेसलाही कमी मते मिळतील, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. मुश्ताक यांच्या बाजूला बसलेले एमबीएचे विद्यार्थी रिंकू यांना वाटते की, उत्तर प्रदेशातील सर्व पक्ष फक्त जातीपातीवर लोकांना मूर्ख बनवत आहेत आणि बसप, सपा यात आघाडीवर आहेत. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे लखनऊमधून तब्बल पाच वेळा निवडून आले आहेत. लखनऊ हे देशातील व्यग्र रेल्वेस्टेशनपैकी एक असून दिवसातून सुमारे 64 रेल्वे येथून जातात. उत्तर प्रदेशसुद्धा देशाच्या राजकारणातील सर्वात व्यग्र जंक्शनपैकी एक आहे. येथून 80 खासदारांची निवड होते. आतापर्यंतच्या 14 पंतप्रधानांपैकी 8 पंतप्रधान उत्तर प्रदेशातूनच निवडून गेले आहेत. या वेळी दक्षिणेतून काही घडामोडी न घडल्यास नवव्यांदा यूपीचाच पंतप्रधान असेल.
पुढील स्टेशन पाटणा...