आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रचाराचे रंग: वाजपेयी-समर्थकांच्या भरवशावर राजनाथ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष राजनाथ सिंह लखनौमध्ये अत्यंत जपून पावले टाकत आहेत. गेल्यावेळी त्यांना गाजियाबादमधून विजय मिळवताना खूप घाम गाळावा लागला होता. त्यामुळे लखनौत वाजपेयींच्या नावाचा पुरेपूर फायदा ते घेत आहेत. यासाठी ते त्यांच्याशी संबंधित व्यक्तींकडे विशेष लक्ष देत आहेत. गतवेळचे खासदार लालजी टंडन यांना सोबत घेण्यास ते विसरत नाहीत. टंडन वाजयेपींच्या खास व्यक्तींपैकी आहेत. भाजपचे अध्यक्ष काही दिवसांपूर्वी प्रचाराला गेले, तेव्हा वाजपेयींचे जुने सहायकदेखील त्यांच्या सोबत होते. बाडमेरमधून बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी करणारे जसवंत सिंह यांच्याबाबत बोलतानाही ते विशेष संयम बाळगत आहेत. जसवंत सिंहदेखील वाजपेयी यांच्या जवळच्या व्यक्तींपैकी एक आहेत.