आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाबड्या लोकसभेची बोलकी \'आप\'बिती...(दिव्य मराठी ब्लॉग)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रिय डॉली
खुप दिवसांनी तुला पत्र लिहायला बसले...
खरंतर आता मनात विचारांचा कल्लोळ उडाला आहे.
नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यात..
निवडणुकीचे पडघम जोरात वाजवले जात आहेत..
प्रत्येकजण मीच शहाणा कसा हे पटवुन देण्यास धडपडत आहे...
पण त्याच बरोबर दुसरा किती नालायक आहे हे ही सांगायला विसरत नाहीत...
पूर्वी आणिबाणीनंतर निवडणुका जाहीर झाल्या होत्या, तेंव्हा फक्त कॉग्रेस विरुद्ध एकच पक्ष ठाम होता ...त्यामुळे आजच्या सारखे डोक्याचे भजे होत नव्हते...
खरंच दोनच पक्ष हवेत... एक सत्ताधारी आणि दुसरा विरोधी...
मतदात्यांना त्यामुळे मत द्यायला सोपे जाते.....
आता जिकडे तिकडे पेव फुटले आहे विविध पक्षांचे.......
काय करु काही सुचत नाही....
बरं मत दिलेच नाही तर मग बोलायचा हक्क ही उरत नाही...
त्यामुळे जागरूक राहुन मतदान केलेच पाहीजे...
याची वारंवार आठवण मिडीयावाले करतच आहे ( कधी कधी ते चांगली कामे पण करतात हं....)
आता मी सांगते माझ्या मनात नेमकी कोणती खळबळ उडाली आहे ती.....
आता मला समजा भाजपला मत देवुन मोदींना पंतप्रधान होण्यास हातभार लागावा असे वाटते.....म्हणजे मी भाजप ज्या युतीत असेल त्या युतीला मत द्यायला हवे.....
हो न ! खरंय न हे? म्हणजे पर्यायाने मोदींना मत दिल्यासारखे होईल...
पण माझा खरा प्रश्न हा आहे की...भाजपचा उमेदवार आमच्या इथे न उभारता युतीमुळे मुळ स्वाभिमानी पक्ष उभा आहे...म्हणजे पर्यायाने मोदींना मत..
पण मुळातच आम्हाला स्वाभीमानी या पक्षाला मत द्यायचे नसेल तर? त्याने आत्तापर्यंत काय दिवे लावलेत ते या मतदार संघाला माहित आहे... दरवर्षी ठराविक प्रकारची आंदोलने पेटवून बालकांच्या तोंडचे दूध लाखो टनाने रस्त्यावर ओतून देतो...सतत आंदोलने करुन स्वत:ची तुंबडी भरवुन घेतो हा पक्ष... लोकांनी नाकारले पण पक्षाने अंतर्गत खेळी करुन युतीचा पाठिंबा घेवुन हे सत्तेत उतरले आहेत...मग आमच्या सारख्या मतदारांची प्रचंड कोंडी झालीय...
भूक नको पण कुत्रा आवर असे म्हणायची वेळ आली आहे...
मी म्हणते जे मला वाटते ते प्रत्येकाला असे काही तरी वाटत असावेच...
कारण वस्तुस्थितीच आहे तशी......
युती करतात हे लोक आणि निवडणुक झाली, की युती फ़ोडुन सत्तेवर आलेल्याला खाली खेचतात हेच लोक...
आम्हाला हे मान्य नाही....पण आम्हा गरिब मतदारांना कोण विचारतोय म्हणा!
आज आघाडी, युती ...अपक्ष...आणि सतराशेसाठ पक्ष.....कोणी एकमताने मग निवडून येणे हे किती अवघड आहे...
म्हणजे परत ये रे माझ्या मागल्या करत घराण्याशाही समोर आम्ही गुढगे टेकायचे...
हे कार्यकर्ते मित्रांनों ! तुम्हाला एकच सांगावेसे वाटते की ...
पक्षांची एवढी चाळण न करता एकीचे बळ साधा....एका नावाखाली...एक व्हा...
मोळीवाल्याची गोष्ट लहानपणी फक्त एक गोष्ट म्हणून ऐकून घेतलीत...तीच आपण पुढच्या पिढीत संक्रमित करतो आहोत...पण ते अंमलात कधी आणि कोणी आणायचे ? हा मोठा प्रश्न आहे...
खरंच ! आता बदल हवा आहे...
महागाईने कळस गाठला आहे,
भ्रष्टाचाराने सारी क्षेत्र पादाक्रांत केली आहेत...
स्त्रीवरील अत्याचारने परिसिमा गाठली आहे..
बेरोजगारीने जनता हवालदिल झाली आहे...
चो-या मा-या, गुंड्गिरी फ़ोफ़ावली आहे.......
अराजकतेने कळस गाठला आहे...
गरिबीने सर्व सीमारेषा ओलांडल्या आहेत...
काय आणि किती सांगू....
ही यादी मारुतीच्या शेपटी सारखी वाढतच राहणार आहे....
आता याला एकच उपाय...मतदार जरी जागा असला , जागरूक असला तरी त्याला जाब विचारण्याइतकी जिभेत आणि अंगात हिंमत अंगी बाणवलीच पाहीजे...
आपण ज्याला निवडून दिले त्याने जर का काही स्वार्थासाठी पक्ष सोडण्याची भाषा केली तर तिथल्या तिथेच त्याला बहिष्कृत करायला हवे...आणि त्या जागी लगेच दुसरा उमेदवार उभा करता यायला हवा...म्हणजे व्यक्ती बदलेल ...पण पक्षाला धक्का नाही लागणार...
पक्ष महत्त्वाचा आहे... त्यावरील निष्ठा ही तितकीच महत्त्वाची आहे..मग भले तो कोणता ही असो....
पक्षाची धर-सोड, किंवा पक्षातंर्गत डावपेच करणा-या नेत्याचे वेळीच कलम करायला हवे..
म्हणजे कार्यकर्ते, जनता याचे नेते हे ’मालक’ न होता..... ’जनतेचे सेवक’ आहोत आपण....ही जाणिव सतत त्यांना करुन द्यायला हवी..
त्यांचा रुबाब हा त्यांच्या कर्तुत्वात दिसला पाहिजे न की त्यांच्या पेहरावात दिसतो..
नेताची वागणूक बदलली, पेहरावात अचानक टापटीपपणा आला की त्यांचा बॅंक बॅलन्स वाढल्याचे हे चिन्ह ...मग लगेच त्याला मिटींगमध्ये सर्वांसमोर सरळ जाब विचारण्याची हिंमत साधारण कार्यकर्याची असली पाहीजे...
मग बघा आमच्या मतदाराला छानशी झोप; जी कित्येक वर्षे डिस्टर्ब आहे...ती लागते की नाही...
पण हा सर्व कल्पना विलास आहे हे मला आत्तापर्यंतच्या अनुभवावरुन दिसते...पण म्हणतात न नियमाला ही अपवाद असतोच की....मग हाच अपवादात्मक नियम या वर्षीच्या १६व्या लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला बघायला मिळेल का ग डॉली?
बघू काय काय होते ते...
असो....आता बरे वाटले बघ...मनाची खळबळ सगळी व्यक्त झाली तेंव्हाच......
बघू आता हा सूर्य अन् हा जयद्रथ......ही वेळ आली आहे...
एक पक्ष पूर्णपणे अधिकाधिक मते घेऊन सत्तेवर यावा...कुणाच्या ही कुबड्या न घेता...आणि कोणता ही गैरधंदा न करता , प्रामाणिकपणे जिंकुन यावा या शुभेच्छा देऊ...
आणि मतदारांना असेच या न त्या कारणाने जागरूक करायचे काम करुयात...सगळे मिळून...
जय हिंद....वंदे मातरम्..!