आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Modi And Mulayamsingh Yadav, Divya Marathi

निवडणुकीची आखाडा: दोन नेते-दोन जागांवर, का?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नरेंद्र मोदी: वाराणसी आणि बडोदा
दोन जागांवर का...
उत्तरप्रदेश आणि बिहारमधील 120 जागांवर मोदी लाटेचा फायदा घेण्याचा भाजपचा विचार आहे. मोदी तेथील कार्यकर्त्यांना सर्वाधिक प्रभावी करू शकतील. माध्यमांच्या सर्वेक्षणात गुजरातमध्ये भाजपला 26 पैकी 22, उत्तर प्रदेशात 80 पैकी 40 जागा मिळू शकतील. पक्षाला वाटते मोदी दोन ठिकाणी लढले, तर 10 टक्के जागा वाढतील.
समर्थकांचे तर्क
नरेंद्र मोदींच्या उमेदवारीमुळे बडोद्यातीलच नव्हे, तर परिसरातील कार्यकर्त्यांतही चैतन्य वाढेल.
- बालकृष्ण शुक्ला, बडोद्यात भाजपचे विद्यमान खासदार
विरोधकांचे आरोप
देशात मोदींची लाट आहे, तर दोन ठिकाणी उमदेवार का? पराभवाची भीती वाटते का?
- अरविंद केजरीवाल, आम आदमी पार्टीचे नेते.
बडोद्यातून फायदा
० गुजरातमधील बडोदा हा भाजपचा सर्वात सुरक्षित मतदारसंघ मानला जातो. 1991 मध्ये दीपिका चिखलिया यांच्या विजयापासून ही जागा भाजपच्याच ताब्यात आहे. फक्त एकदाच ही जागा कॉँग्रेसला मिळविता आली आहे.
० बडोद्यानजीक आनंद, खेडा यासारख्या जागांवर कॉँग्रेसचा प्रभाव आहे. मोदी बडोद्यातून लढताना या शेजारील जागांवर देखील भाजप उमेदवार निवडून आण इच्छितात.
वाराणसीतून फायदा
० 86 जागांवर सरळ प्रभाव, ज्यात पूर्वांचलमधील 32, बिहारमधील 40, झारखंड, छत्तीसगड, मध्यप्रदेशातील 14 जागांचा समावेश.
० त्याबरोबरच उत्तर प्रदेशातील उर्वरित 48 जागा व बाकी हिंदीभाषिक राज्यांमध्ये प्रभाव पाडणे.
० हा असा भाग आहे, जेथून भाजपला गेल्या निवडणुकीत 150 पैकी फक्त 40 जागा मिळाल्या होत्या. यावेळी दुप्पट जागा जिंकण्याचे पक्षाचे लक्ष्य आहे.
जिंकल्यावर मतदारसंघ सोडला तर...
बडोद्यातील जागा सोडल्यास

० गुजरातच्या तुलनेत उत्तर प्रदेशला प्राधान्य दिल्यास नंतर होणा-या पोटनिवडणुकीत उमेदवाराला स्थानिक मतदारांची नाराजी सहन करावी लागेल. भलेही ते जिंकतील. पण मताधिक्य कमी असेल. 1998 मध्ये येथून बडोद्यातील महाराजांचे वंशज सत्यजीतराव गायकवाड हे कॉँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते.
वाराणसीतून राजीनामा दिल्यास
० मोदींनी जागा सोडल्यानंतरच्या उमेदवारासाठी वादग्रस्त स्थिती निर्माण होणे शक्य. बाहेरच्या उमेदवाराबद्दल नाराजी.
० एकेकाळी कमलापती त्रिपाठी आणि अनिल शास्त्री यांच्यासारख्या कॉँग्रेस नेत्यांचा बालेकिल्ला असलेल्या वाराणसीतील वातावरण बदलण्यास वेळ लागत नाही. 2004 मध्येही येथून कॉँग्रेसचाच उमेदवार जिंकला होता.

पुढे वाचा मुलायमविषयी.....