आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Naveen Patnaik,pawan Kumar Chamling,Manikrao Sarkar

निवडणुकीचा आखाडा: तीन राज्यांची ओळख आहेत हे धुरंधर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चामलिंग : सिक्कीमला हाच पक्ष व विरोधक
सिक्कीममध्ये गेल्या 20 वर्षांपासून मुख्यमंत्री असलेले पवनकुमार चामलिंग पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. येथे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका बरोबरच होत आहेत. चामलिंग यांचा पक्ष सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंटला आव्हान देणारे येथे कोणी नाही. त्यांना मिळणा-या पाठिंब्याचा अंदाज यावरूनच वर्तविला जाऊ शकतो, की गेल्या निवडणुकीत त्यांनी राज्यातील सर्व 32 जागा जिंकल्या होत्या. हा एक विक्रमच आहे.

22 सप्टेंबर 1950 चा जन्म असलेल्या चामलिंग यांनी कारकीर्दीची सुरूवात सरकारी ठेकेदारीने केली
1973 मध्ये पंचायतीद्वारे राजकारणात पदार्पण.
एकतर्फी विजयाचे कारण
शासकीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या चामलिंग यांनी आपल्या त्याच अनुभवाचा उपयोग प्रत्येक स्तरावर विकासासाठी केला. लोकांना चांगले बदल जाणवताच चामलिंग यांना मिळणारा पाठिंबा सतत वाढतच गेला.
लोकसभेत...
1996 पासून सिक्कीममधील लोकसभेच्या एकमेव जागेवर चामलिंग यांच्या पक्षाचा उमेदवार विजयी होत आहे.
०शंभर टक्के सांडपाणी निचरा व्यवस्था असणारे सिक्कीम हे देशात प्रथम राज्य.
०2004 मध्ये राज्यात गरीबी 31 टक्के होती. आता ती 13 टक्क्यांवर आहे. 2015 मध्ये ती शून्य टक्के करणे चामलिंग सरकारचे लक्ष्य आहे.
०आता पुढील ध्येय सिक्कीमला 2015 पर्यंत संपूर्ण सेंद्रिय तंत्रावर आधारित राज्य बनविण्याचे आहे.

पुढे वाचा नवीन पटनाइक यांच्याविषयी....