आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओडिशाच्या निवडणूक आखाड्यात प्रथमच 15 तारे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकारणात चंदेरी ता-यांचे झळकणे ही काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. परंतु, ओडिशात यावेळी या ता-यांचे चमकणे थोडं जास्तच आहे. काही लोकसभेमध्ये तर काही याबरोबरच होत असलेल्या विधानसभा निवडणुकीतही नशीब अजमावत आहेत. धृतीकाम मोहंती यांचा वृतांत.

अपराजिता काँग्रेस बरोबर आल्या...
ओडिशा चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव असलेली अभिनेत्री म्हणजे अपराजिता मोहंती.
70 पेक्षा जास्त उडीया चित्रपटांमध्ये अभिनयाचा ठसा उमटविलेल्या अपराजिता कॉंग्रेसमध्ये सामील झाल्या आहेत. त्या कटकमधून कॉंग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांचे दादा सुभान अली खान ओडिसाचे मंत्री होते. अपराजिता यांचे पती उत्तम मोहंती हे अभिनेते आहेत.अपराजिता यांच्याबरोबरच आणखी एक चंदेरी तारे विजय मोहंती यांनी कॉंग्रेसकडून विजय भुवनेश्वरमधून लढत आहे.


भाजपमध्येसुद्धा तीन तारे
येथे भाजप भलेही कमी पडली असेल, परंतू चित्रपट ता-यांना जोडण्यात ते सुद्धा मागे नाहीत. श्रीत्तम दास, पिंटू नंदा व पिंकी प्रधान भाजपला जोडले गेले आहेत.
अन्य पक्षही मागे नाहीत : चित्रपट व दूरचित्रवाणी अभिनेत्री मिली मोहंती यांनीही कोणत्याही मोठ्या पक्षाबरोबर जाण्याऐवजी ओडिशाचा एक छोटी पक्ष अमा ओडिशा पार्टीत सामील होणे पसंत केले. प्रख्यात ाायक सुभाष दास सपात गेले आहे.
प्रशांत नंदा बनले होते इतर ता-यांसाठी मोठी प्रेरणा : वर्ष 2000 मध्ये प्रशांत नंदा यांनी भाजपात प्रवेश केला होता. ते मंत्रीही बनले. त्यानंतर सिद्धार्थ महापात्र बीजेडीचे आमदार बनले. त्यानंतर खासदारही.
... आणि ता-यांच्या निवडणूक ज्वराने सिने इंडस्ट्रीही ठप्प
मोठ्या चित्रपट ता-यांच्या राजकारणात प्रवेश करण्याच्या वाढत्या कलामुळे उडियातील चित्रपट निर्मात्यांना चिंताक्रांत केले आहे. मोठे मोठे चित्रतारे निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत. त्यांच्याकडे चित्रपटांच्या चित्रिकरणासाठी व त्यांच्या प्रचाराकरीता अजिबात वेळ नाही. अपराजिता मोहंती, बिजॉय मोहंती आणि मिहिर दास निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. सुपरस्टार अनुभव मोहंती देखील बीजेडी समवेत निवडणूक प्रचारात रमले आहेत. त्यामुळेच काही चित्रपटांच्या प्रदर्शनावर परिणाम होऊ शकतो. दिग्दर्शक सुशांत मणि म्हणतात की, आमची इंडस्ट्री सध्या वाईट काळातून जात आहे. ओडिशात रिअल इस्टेट व चिट फंड कंपन्यातही मंदी असल्याने चित्रपटांचे अर्थकारणही रखडले आहे. इकडे ता-यांना नेतेपदाचे वेध आहे.


सर्वात जास्त तारे बीजेडीबरोबरच
काही काळापूर्वी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या उपस्थितीत उडिया चित्रपटसृष्टीत तीन मोठ्या नावांशी बीजू जनता दलाने आपले नाव जोडले. त्यामध्ये मिहिर दास, सात्यकी मिश्रा, आणि गायक तृप्ती दास यांचा समावेश आहे. यापूर्वी आकाश दास नायक, संगीतकार अमरेंद्र मोहंती, मनमथ मिश्रा, तरूण संगीतकार प्रेम आनंद, अभिनेता अरिंदम हे सुद्धा बीजेडी बरोबर या निवडणुकीपूर्वीच जोडले गेले आहेत. गतवर्षी देखील स्थानिक निवडणुकीमध्ये काही मोठे अभिनेते बीजेडी बरोबर होते. त्यात सुपरस्टार अनुभव मोहंती, कॉमेडियन पप्पू पोमपोम यांचा समावेश आहे. आकाश दास व पप्पू पोमपोम हे तर यावेळी विधानसभा निवडणूक सुद्धा लढविणार आहेत.