आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराहुल गांधी पिचकारी : ही केवळ मम्मीला विचारूनच चालते. यात पाणी कमी, हवाच जास्त. कंपनीने युवावर्गाची पहिली पसंती म्हणत विक्री केली आहे.
नरेंद्र मोदी पिचकारी : ही जोराच्या आवाजाने चालली कंपनीचा दावा आहे की, ही चालली तर देशाच्या समस्या संपतील.
सोनिया गांधी पिचकारी : खास पिचकारी आहे, जी समोर न येताच चालते. ती खास इटलीहून आयात केलेली आहे.
मनमोहन सिंग पिचकारी : या पिचकारीत सायलेन्सल फिट. आवाज न करता वर्षानुवर्षे चालण्याची हमी. गुणवत्तेचा फैसला इतिहासच करणार
ममता बॅनर्जी पिचकारी : ही केवळ दिदी लोकांकरीताच होती. कंपनीने हिच्यासमवेत अण्णा ब्रॅन्डचे रंग मोफत वाटले आहेत.लोकांनी पाकिट खोलले तेव्हा काहीच नव्हते.
दिग्विजय सिंह पिचकारी : सर्वात खतरनाक. जेव्हाही उडाली तेव्हा वाद यामुळे तेव्हा कंपनीने पहिलेच स्पष्ट केले. यामुळे होणा-या वादाशी आमचा संबंध नसेल.
अरविंद केजरीवाल पिचकारी : बरोबर कंपनी पाणी मोफत देत होती. याच हमीने की किमान 49 दिवस ती चालेलच चालेल....
राज ठाकरे पिचकारी : हिची विक्री फक्त मुंबईतच. फक्त उत्तर भारतीयांवरच चालली.
शीला दीक्षित पिचकारी : ही पिचकारी फक्त दिल्लीकरीताच बनविलेली होती. परंतु, तेथे फारशी डिमांड नसल्याने कंपनीने तिला केरळला पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
जयललिता पिचकारी : या पिचकारीला तमिळनाडूमध्ये खूप मागणी असून, कंपनीने हिच्यासमवेत अनेक ऑफर्स दिल्या. जशा की मोफत तांदूळ, साडी, टीव्ही आदी. काही ग्राहकांसाठी तुरुंगात कैदी असलेल्या नातेवाईकांची सुटका देखील झाली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.