आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातात हात-पाय गमावलेल्यांना नवी उमेद; कारागिरांकडून कृत्रिम हात-पाय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- वेगवेगळ्या अपघातांत हात किंवा पाय गमावलेल्यांच्या आयुष्यात नवी उमेद जागविण्याचे काम निलकमल फाऊंडेशन आणि अपघातग्रस्त कामगार संघटनेच्यावतीने शहरात सुरू आहे. नाशिकच्या औद्याेगिक क्षेत्रात प्रेसिंग मशिन्स किंवा तत्सम मशिन्सवर काम करतांना हाताची बाेटं गेलेल्या जवळपास ७० कामगारांनाही या उपक्रमातून कृत्रिम बाेट मिळणार असून आज तुटलेल्या बाेटांमुळे त्यांचे दिसणारे व्यंग यापुढे समाेरच्याला जाणवणार नाही, हे नक्की. 

 

निलकमल फाऊंडेशन, मुंबई यांच्याकडून माेफत अशाप्रकारे कृत्रिम हात-पाय बसवून दिले जातात. याची माहीती नाशिकमध्ये औद्याेगिक क्षेत्रात अपघातग्रस्त कामगारांसाठी काम करणाऱ्या संघटनेला मिळाली, त्यांनी फाऊंडेशनशी संपर्क साधला अाणि त्यांनी नाशिकला याकरीता शिबीर घेण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार दाेन दिवसांपुर्वी या शिबिराचे उद‌््घाटन झाले, ज्यात फाऊंडेशनचे संस्थापक वामनराय पारेख, माजी महापाैर अशाेक मुर्तडक, फाऊंडेशनचे उपाध्यक्ष दिनकर कठाडे, अपघातग्रस्त कामगार संघटनेचे अध्यक्ष कैलास माेरे यांच्या उपस्थितीत सबंधितांची नाेंदणी व कृत्रिम अवयव निर्मितीकरीता माप घेण्यात आली. यात, नाशिकसह परभणी, जालना, औरंगाबाद, जळगाव, चाळीसगाव, बीड येथून अपघातात हात-पाय गमावलेल्या व कृत्रिम अवयव बसवून घेण्याची इच्छा असलेल्या १२५ व्यक्तींच्या हात-पाय, बाेटं या अवयवांची माप घेण्यात आली असून अवयव निर्मीतीचे काम सध्या अंबड पाेलीस ठाण्याजवळील निकीती मंगलकार्यालय येथे दिवसरात्र सुरू आहे. 

 

आजचा दिवस संस्मरणीय 
आज कृत्रिम अवयव संबंधित अपघातग्रस्तांना बसविले जाणार असून ३५ व्यक्तींना हात, ६८ व्यक्तींना पाय तर ७० जणांना बाेटं बसविली जाणार आहेत. अपघातामुळे आलेल्या अपंगत्वावर या कृत्रिम अवयवांमुळे मात करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती या लाेकांमध्ये आज जागणार असून त्यांच्याकरीता हा दिवस खऱ्या अर्थाने संस्मरणीय ठरणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...