आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात कृत्रिम पाऊस, आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पुणे विभागाच्या हवामान खात्याकडून कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी केली आहे. यासाठी सोलापूर विमानतळावर दोन विमानेही तैनात केली आहेत. 


कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत आज मंगळवारी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीस पुणे हवामान विभागाच्या प्रकल्प संचालिका थारा प्रभाकरणन यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित राहणार आहेत. बैठकीत कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...