आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑलिम्पिकमध्ये उकाड्याचा त्रास नको म्हणून कृत्रिम बर्फवृष्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो : २०२० मध्ये होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी सध्या जपानमध्ये जय्यत तयारी सुरू आहे. जुलैमध्ये टोकियोत हवेतील आर्द्रता ८० टक्क्यांपर्यंत असते. तापमान ३० अंशापेक्षा अधिक नसते. तरीही प्रेक्षकांना उकाड्याचा त्रास होऊ नये म्हणून या प्रेक्षकांवर कृत्रिम बर्फवृष्टी केली जाणार आहे. याची चाचणी शुक्रवारी घेण्यात आली. सुमारे ३०० किलो बर्फाचा कृत्रिम बर्फवृष्टीसाठी वापर करण्यात आला. ही चाचणी यशस्वी झाली.

कृत्रिम बर्फवृष्टीची चाचणी यशस्वी
खास ऑलिम्पिकसाठी ८ नवे स्टेडियम बांधले. यातील ५ स्टेडियम तर १४ महिन्यांपूर्वीच तयार आहेत.
टोकियोतील मुख्य स्टेडियमही ९० टक्के बांधून तयार आहे. ते नोव्हेंबरमध्ये खुले केले जाईल.
हे सर्वात हायटेक ऑलिम्पिक. प्रेक्षकांना रोबोट मदत. चेहऱ्याची ओळख दाखवून प्रवेश.