आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोकाट कुत्र्यांच्या झंुडीने घेतला कलावंताचा प्राण; दुचाकीवर जाताना तोल जाऊन डोक्याला गंभीर इजा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहरातील मोकाट कुत्र्यांना आळा घालण्यात मनपा अपयशी ठरल्याने ऑर्गनवादक, कथालेखक अशोक हरिनाथ जाधव (५५, रा. वालसावंगी, ता. भोकरदन, जि. जालना) यांना जीव गमवावा लागला. ते ९ ऑक्टोबर रोजी मुलासोबत दुचाकीवरून जात असताना कुत्र्यांचा मोठा घोळका दुचाकीसमोर आडवा येऊन धावून आल्याने तोल जाऊन ते खाली पडले होते. उपचार सुरू असताना गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता त्यांचा मृत्यू झाला. 


जाधव सकाळी ११.३० वाजता मुलगा सागरसोबत रुग्णालयात तपासणीसाठी दुचाकीने (एमएच २० डी डब्ल्यू ४३५९) निघाले. पण काही आवश्यक कागदपत्रे घरीच राहिल्याचे त्यांच्या लक्षात आले. म्हणून ते बीड बायपासवरील सिद्धिविनायक अपार्टमेंटमधील त्यांच्या घराकडे निघाले. बेंबडे रुग्णालयाच्या मागील रस्त्यावरून ते जात असताना मोकाट कुत्र्यांची झंुड त्यांच्या मागे लागली. त्यामुळे दुचाकीचा तोल जाऊन सागरसह ते रस्त्याच्या कडेला असलेल्या तार कंपाउंडच्या पोलला धडकले सागरने स्वत:ला सावरत वडिलांकडे पाहिले. तेव्हा त्यांच्या पायाला किरकोळ जखम झाल्याचे त्याला दिसले. म्हणून त्याने त्यांना घरी नेले. घरात प्रवेश करताच जाधव यांना अचानक चक्कर आली. मग कुटुंबाने त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. तपासणी केल्यावर त्यांच्या मेंदू व पोटात रक्तस्राव सुरू असल्याचे निदर्शनास आले. दोन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यावर गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. मनपामुळेच जाधव यांना जीव गमवावा लागला, असा आरोप जाधव यांच्या कुटुंबीयांनी केला. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार नारायण बऱ्हाटे तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...