आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाबूल - काबूल येथील भारतीय राजदूत कार्यालयातील महात्मा गांधींचे भित्तिशिल्प पुन्हा एकदा शांततेचा शक्तिशाली संदेश देण्यासाठी सज्ज झाले आहे. मे २०१७ च्या दहशतवादी हल्ल्यात अशाच प्रकारचे शिल्प नष्ट करण्यात आले हाेते. त्या हल्ल्यात १४० जणांचा मृत्यू झाला हाेता. अफगाणिस्तानच्या कलाकारांचा गट आर्टलाॅर्ड््स बापूंच्या १५० व्या जयंतीपूर्वी ते पुन्हा साकारले आहे. त्यावर महात्मा गांधी यांनी दिलेला संदेश इंग्लिश तसेच पर्शियन भाषेत रेखाटण्यात आला आहे. प्रेमाच्या शक्तीचे सत्तेवर अधिपत्य हाेईल. त्यादिवशी जग शांततेला चांगल्या प्रकारे समजू शकेल, अशा आशयाचे संदेश त्यातून दिला आहे. त्याबाबत कलाकार म्हणाले, महात्मा गांधींना यापेक्षा वेगळी श्रद्धांजली दिली जाऊ शकत नाही. सात कलाकारांनी ३२५ चाैरस फूट आकारातील हा शिल्प संदेश प्रत्यक्षात आणला आहे.
बापूंच्या अहिंसेच्या विचारांबद्दल नितांत आदर
आर्टलाॅर्ड्स प्रमुख ओमैद फरिदी म्हणाले, अफगाणिस्तानातील लाेकांची गांधीजींच्या शांती, अहिंसेच्या तत्त्वज्ञानावर श्रद्धा आहे. शांतीसाठी लढणारा व्यक्ती अशी त्यांची आेळख आहे. ही आेळख येथे कायम ठेवणे गरजेचे हाेते. ही संस्था अफगाणिस्तानातील शिक्षण प्रणालीस कला-संस्कृती जाेडण्याची समर्थक आहे. त्यामुळेच जगभरातून महिला कलाकारांचा संपर्क व संवाद वाढवण्यासाठी प्राेत्साहन देण्याचे काम करते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.