आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Arun Gawli's Daughter Geeta Will Contest Second Time In Election From All India Sena

अरुण गवळीच्या अखिल भारतीय सेनेकडून मुलगी गीता गवळी दुसऱ्यांदा रिंगणात; राज्यात १०-१२ उमेदवार उभे करण्यावर विचार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विधानसभेसाठी अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांच्या दगडी चाळीत लगबग सुरू आहे. २०१४ मध्ये “डॅडी’ची कन्या गीता गवळी थोडक्यात पराभूत झाल्या. तुरुंगात असलेलेे डॅडी बाहेर आले तर प्रचाराचीही गरज पडणार नाही, असा विश्वास त्यांना वाटतोय. १० ते १२ जागी उमेदवार उभे करण्याचा त्यांच्या अखिल भारतीय सेनेचा विचार आहे. सलग २ निवडणुकांत पराभूत झालेल्या अखिल भारतीय सेनेच्या दगडी चाळीतील मध्यवर्ती कार्यालयात गर्दी दिसते. भायखळा दगडी चाळ नवरात्र उत्सव मंडळाचे हे ४६ वे वर्ष आहे. निवडणुकीच्या तोंडावरच सण आल्याने येथे नवरात्रीतून निवडणुकीच्या जागराची तयारी सुरू आहे. 

२०१४ मध्ये एमआयएमचे वारीस पठाण अवघ्या १३८२ मतांनी निवडून आले. एमआयएम, भाजप, काँग्रेस, मनसे आणि अखिल भारतीय सेनेत मत विभागणी झाली. गीता म्हणाल्या, पठाण यांनी थेट धर्माच्या नावावर मते मागितली. यामुळे आमचा मुस्लिम मतदार तुटला आणि पराभव झाला. हा डॅडीचा बांधलेला मतदार असल्याची खात्री आम्हाला होती. यंदा अशी चूक होणार नाही. भायखळ्याचा आमदार दगडी चाळीतून होणार.
 

मुंबई बॉम्बस्फोटानंतर गवळी शिवसेनेच्या जवळ आला. नंंतर त्याने स्वत:चा अखिल भारतीय सेना पक्ष स्थापन केला. २००४ मध्ये तो आमदार बनला. शिवसेनेचे घाटकोपरचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या हत्याप्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. तो सध्या नागपूर कारागृहात शिक्षा भोगत आहे. 
 
 

फर्लाेवर सुटका अशक्य 
अरुण गवळी ९ मे २०१९ला संचित रजेवर (फर्लो) सुटला. कुटुंबीयांना भेटण्यासाठी त्याने केलेला फर्लोचा अर्ज कारागृहाने मुंबईत लोकसभा निवडणुका असल्याने फेटाळला. त्याला गवळीने हायकोर्टात आव्हान दिले. कोर्टाने निवडणुकीनंतर रजेवर सोडण्याचे निर्देश दिले. त्यानुसार ९ मे रोजी गवळीला २८ दिवसांचा फर्लाे मिळाला. यामुळे त्याला आता परत फर्लाे मिळणे अशक्य असल्याचे सूत्र सांगतात. 
 

प्रचारासाठी डॅडी आले तर विजय पक्का : गीत गवळी
वॉर्ड क्रमांक २१२ च्या नगरसेविका गीता गवळी म्हणाल्या, डॅडींनी ३० वर्षे भरपूर काम केले आहे. आम्ही केवळ विकास आणि भयमुक्त समाजाच्या नावावर मत मागणार आहोत. प्रचारासाठी वडील आले तर आमचा विजय पक्का आहे. पण सरकार त्यांना पॅरोलवर सोडणार नाही, असे वाटते.
 

डॅडीवर दोन चित्रपट
गवळीवर आतापर्यंत दोन चित्रपट आले आहेत. २०१५ मधील दगडी चाळ या मराठी चित्रपटात मकरंद देशपांडेनी गवळीची भूमिका साकारली. २०१७ मध्ये डॅडी या हिंदी चित्रपटात अर्जुन रामपाल याने गवळीची भूमिका केली. आता डॅडीच्या सिक्वेलचे काम सुरू झाले आहे. ‘डॅडी’ची मुलगी योगिता गवळी सहनिर्मितीची आहे.