आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Arun Jaitley Arrives At AIIMS, Modi Shah Arrives To Meet Breathing Arun Jaitley Admitted To AIIMS Delhi Live News, Arun Jaitley Former Finance Minister BJP Leader Health News

श्वास घेण्यास त्रास होत असल्याने अरुण जेटली एम्समध्ये दाखल, मोदी-शाह भेटण्यासाठी पोहचले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- माजी अर्थ मंत्री अरुण जेटलींना आज(शुक्रवार)सकाळी दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनुसार त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी सकाळी 11 वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले. रिपोर्ट्सनुसार, जेटलींना श्वास घेण्यास त्रास होत आहे.  गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरोग्य मंत्री हर्षवर्धन त्यांची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत. याआधी जेटलींना सॉफ्ट टिश्यू कँसरच्या उपचारासाठी न्यूयॉर्कला जावे लागले होते. 
 

यूएसवरुन परत आल्यावर खूप चांगेल वाटत आहे- अरुण जेटली
जेटली यांनी अमेरिकेतून उपचार करुन आल्यानंतर एक ट्वीट केले होते- "घरी आल्यावर चांगले वाटत आहे." जेटली यांनी एप्रिल 2018 मध्येही ऑफीसवर जाणे बंद केले होते. यानंतर त्यांना एम्समध्ये दाखल केले होते. त्यांची किडनी ट्रान्सप्लँट केली होती. त्यानंतर ऑगस्टमध्ये ते परत कामावर आले होते.

बातम्या आणखी आहेत...