आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरक्षा परिषदेतील चीनच्या समावेशाठी नेहरूच खरे गुन्हेगार, अर्थमंत्री अरुण जेटलींचा आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कुख्यात मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यात चीनने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत पुन्हा एकदा आडकाठी आणली. यावर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी तर चीनच्या सुरक्षा परिषदेतील समावेशाचे पंडित जवाहरलाल नेहरूच खरे गुन्हेगार असल्याचा आरोप केला. राहुल गांधी यांनी गुरुवारी सकाळी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी कमकुवत असून चिनी राष्ट्रपतींना ते घाबरतात, असे ट्विट केले होते. यावर जेटलींनी थेट नेहरूंनाच जबाबदार ठरवले.


भारत-अमेरिका एकत्र
जैश-ए-मोहंमदचा म्होरक्या मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यात आडकाठी घालणाऱ्या चीनबद्दल भारत व अमेरिकेने आक्षेप नोंदवला. अझहरला अटकाव करण्यासाठी दोन्ही देश एकत्रितपणे प्रयत्न करतील.


नेहरूंच्या पत्राचा उल्लेख 
जेटली यांनी त्या काळात पं. नेहरू यांनी दिलेल्या पत्राचा ट्विटमध्ये उल्लेख केला. सुरक्षा परिषदेत अमेरिकेला चीनऐवजी भारत हवा होता. मात्र, नेहरूंनी चीन महान देश असल्याचे सांगत हा प्रस्ताव फेटाळला. चीनला सुरक्षा परिषदेत स्थान देण्यात खरे गुन्हेगार कोण आहेत हे काँग्रेस अध्यक्षांनी सांगावे, असे जेटलींनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...