Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | Arun Jaitley Back As Finance Minister after kidney transplant

कशामुळे जेटली कोणाशीही मिळवू शकत नाहीत हात, मोदींनाही केले होते नमस्ते

हेल्थ डेस्क | Update - Aug 24, 2018, 01:02 PM IST

जवळपास 100 दिवसांनी 65 वर्षीय केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी अर्थ मंत्रालयाचा कार्यभार सांभाळला. ते 14 मे पासून किडनी

 • Arun Jaitley Back As Finance Minister after kidney transplant

  हेल्थ डेस्क - जवळपास 100 दिवसांनी 65 वर्षीय केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी अर्थ मंत्रालयाचा कार्यभार सांभाळला. ते 14 मे पासून किडनी ट्रांसप्लांटनंतर घरी होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जेटली यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या लोकांना बूट-चप्पल झाकून भेट घ्यावी लागेल. यासाठी बुटांवर निळ्या रंगाची मेडिकेटेड बॅग लावली लागेल.


  डॉ संदीप सक्सेना (नेफ्रोलॉजिस्ट, अपोलो हॉस्पिटल इंदूर) यांनी दिलेल्या माहितीनुसार, किडनी ट्रांसप्लांटनंतर कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शनपासून दूर राहण्यासाठी असे केले जाते. इन्फेक्शन डस्ट, कफ, हॅन्ड कॉन्टॅक्ट आणि इतरही गोष्टींमुळे होऊ शकते. बुटांमुळेसुद्धा इन्फेक्शन होऊ शकते, यामुळे ही सावधानी बाळगली जाते. किडनी ट्रांसप्लांटनंतर सुरुवातीचे तीन महिने जास्त काळजी घेतली जाते. एखाद्याला इंफेक्शन झाल्यास लगेच अँटिबायोटिक औषध दिले जाते. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत, किडनी ट्रांसप्लांटनंतर कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष देणे अत्यावश्यक आहे.


  टेक्निकल स्वरूपात ट्रांसप्लांट तेव्हाच यशस्वी मानले जाते जेव्हा शरीर नवीन अवयव आणि त्याची कार्यप्रणाली स्वीकार करते. किडनी ट्रांसप्लांटसुद्धा असेच आहे. या प्रक्रियेनंतर व्यक्तीला रिलॅक्स झाल्यासारखे वाटते परंतु या काळात करण्यात आलेल्या दुर्लक्षामुळे विविध समस्या निर्माण होऊ शकतात. सिनिअर कंसल्टेंट डॉ. प्रेम प्रकाश वर्मा आणि नेफ्रोलॉजिस्ट डॉ. पीएन गुप्ता यांनी संदर्भात खास माहिती दिली आहे.


  पहिला प्रश्न : किडनी ट्रांसप्लांट औषधी आणि पथ्य पुरेसे आहेत का?
  उत्तर
  : अशा परिस्थितीमध्ये इन्फेक्शन होण्याचा धोका जास्त राहतो. ट्रांसप्लांटनंतर किडनी रिजेक्शनपासून दूर राहण्यासाठी रुग्णाला काही औषधी दिल्या जातात, याचा प्रभाव त्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर पडतो. यामुळे रुग्णाला व्हायरल, फंगल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन आणि सर्दी-पडसे यासारख्या छोट्या-छोट्या आजारांमध्येही सावध राहणे आवश्यक आहे. यामुळे औषधी आणि पथ्य याशिवाय डॉक्टर सल्ल्याने लसीकरण अवश्य करून घ्यावे.


  दुसरा प्रश्न : अशा रुग्णांनी डॉक्टरांकडून केव्हा-केव्हा सल्ला घ्यावा?
  उत्तर :
  किडनी ट्रांसप्लांटनंतर एखाद्या प्रकारची जखम, युरिनरी ट्रॅक संक्रमण लक्षात आले किंवा श्वसनाशी संबंधित संक्रमण दिसून आले उदा. सर्दी, खोकला झाल्यास लगेच डॉक्टरांकडे जावे. छोट्या-छोट्या आजारांकडेही दुर्लक्ष करू नये. प्रवासाला जाणार असाल तर डॉक्टरांना अवश्य सांगावे आणि आवश्यक पथ्य पाळावेत.


  तिसरा प्रश्न : कोणकोणता त्रास होऊ शकतो?
  उत्तर :
  ट्रान्सप्लांटनंतर हाय ब्लडप्रेशरवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नियमितपणे व्यायाम करून वजन नियंत्रित ठेवावे आणि लो सोडियम डायट घ्यावे. ब्लडप्रेशरच्या औषधांनी हे सांभाळले जाऊ शकते. या व्यतिरिक्त वजन वाढू शकते. असे औषधांमुळे होऊ शकते. वाढते वजनही रक्तदाब वाढण्याचा धोका ठरू शकते. यामुळे ट्रांसप्लांटनंतर मधुमेह आणि हृदयरोग वाढण्याची शक्यता वाढते. यामुळे डॉक्टरांनी सांगितलेले पथ्य अवश्य पाळावेत.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन गोष्टी...

 • Arun Jaitley Back As Finance Minister after kidney transplant

  चौथा प्रश्न : ट्रांसप्लांटनंतर आहार कसा असावा?
  उत्तर : यशस्वी ट्रांसप्लांटेशनमध्ये आहाराची भूमिका महत्त्वाची ठरते. आहारामध्ये जास्त प्रमाणात हलके, वसा रहित, कमी मीठ असलेले जेवण घ्यावे. दररोज 8-10 ग्लास पाणी अवश्य प्यावे. जेवणात जास्त प्रमाणात सोडियम, फॉस्फोरस, पोटॅशियम घेऊ नये. पालक, कोथिंबीर, बटाटे, रताळे खाऊ नयेत. मांसाहार करू नये. फळभाज्या धुवून खाव्यात. शिळे अन्न खाऊ नये.

 • Arun Jaitley Back As Finance Minister after kidney transplant

  पाचवा प्रश्न - किडनी निरोगी ठेवण्यासाठी काय करावे 
  उत्तर :
  किडनी आजारामध्ये सर्वात जास्त लक्षण हा आजार शेवटच्या टप्प्यात गेल्यानंतर दिसून येतात. युरिनमध्ये ब्लड येणे, युरीन कमी किंवा जास्त होणे, पाय, तळवे आणि टाच सुजणे, थकवा जाणवणे, झोप न लागणे, मळमळ होणे इ. गोष्टी किडनी आजाराचे लक्षण असू शकतात. अशा परिस्थितीमध्ये डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. मधुमेह, बॅक्टेरियल आणि व्हायरल संक्रमण, टॉन्सिल, अल्कोहलचा वापर, धूम्रपान करणे, ड्रग्स किडनीला नुकसान पोहोचवतात, यापासून दूर राहावे.

Trending