आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Arun Jaitley Death| There Are Five Coincidences Between Sushma Swaraj And Arun Jaitley

कर क्रांतीचा अरुण अस्त: सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांच्यात ५ असेही योगायोग

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली  - दीर्घकाळापासून आजारी असलेले अरुण जेटली (६६) यांचे शनिवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना नऊ ऑगस्ट रोजी एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. गेल्या वर्षी एम्समध्ये त्यांचे किडनी प्रत्यारोपण झाले होते. त्यानंतर काही महिन्यांनी ते राजकारणात सक्रिय झाले. मात्र त्यांना सॉफ्ट टिश्यू कर्करोग झाल्याचे समोर आले होते. रविवारी सकाळी ११ वाजता जेटली यांचे पार्थिव भाजप मुख्यालयात ठेवले जाईल. दुपारनंतर त्यांच्यावर बोधघाटावर राजकीय सन्मानात अंत्यसंस्कार होतील.  तीन देशांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेटली यांच्या कुटुंबीयांचे फोनवरून सांत्वन केले. 
 

...कारकीर्द : प्रत्येक खेळपट्टीवर यश

सत्ता : मोदी सरकारमध्ये नं.-२
> १९७४ मध्ये दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष. १९७५ : आणीबाणीत १९ महिने तुरुंगात.
> १३ ऑक्टोबर १९९९ रोजी वाजपेयी सरकारमध्ये माहिती-प्रसारण मंत्रिपदाची जबाबदारी. नंतर २०१४ मध्ये मोदी सरकारमध्ये नंबर-२ चे नेते होते. 
 

वकिली : ३७ व्या वर्षी एएसजी
> १९९० मध्ये वयाच्या ३७व्या वर्षी सॉलिसिटर जनरल. बोफोर्स खटला सोपवण्यात आला. यातील सीमापार व्यवहारातील चौकशीत सहभागी होते. 
 

क्रिकेट : मुंबईच्या वर्चस्वाला सुरुंग
> १९९ मध्ये दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष. मुंबईचे वर्चस्व मोडून काढले. येथून सेहवाग, धवन चोप्रा हे खेळाडू घडले. 
 

संकटमोचक : मोदींचे चाणक्यही...

गुजरात दंगलीनंतर कायद्याच्या अडचणी दूर केल्या होत्या...
 
> २००२ मधील गुजरात दंगलीनंतर मोदी यांना आलेल्या कायदेशीर अडचणी दूर करण्याची जबाबदारी सांभाळली. लोक त्यांना माेदी यांचे चाणक्य म्हणत. 
> २०१० च्या सोहराबुद्दीन शेख एन्काउंटर प्रकरणात कोर्टाने अमित शहांना गुजरात प्रवेशबंदी केली तेव्हा शहांनी अॅड. जेटलींची मदत घेतली आणि बंदी उठली. 
> जेटली यांनी पंतप्रधानपदासाठी मोदींच्या नावासाठी भाजपमधील कनिष्ठ,वरिष्ठ नेत्यांची मने वळवली.
> अर्थमंत्री म्हणून सर्वाधिक बदल आणि जोखीम असलेले निर्णय घेतले. नोटबंदी, जीएसटी, दिवाळखोरी विधेयक, जनधन यासारखे ऐतिहासिक निर्णय घेतले.
 

सुषमा आणि जेटली यांच्यात ५ असेही योगायोग
> सुषमा स्वराज आणि जेटली या दोघांचाही जन्म १९५२ चा. मृत्यूही या वर्षी ऑगस्टमध्येच झाला.
> दोघेही वाजपेयी सरकारमध्ये सर्वप्रथम मंत्री झाले. सुषमा १९९६ मध्ये आणि जेटली १९९९ मध्ये मंत्री झाले. 
> दोघेही विरोधी पक्षनेतेपदी राहिले. सुषमा स्वराज लोकसभेत, जेटली राज्यसभेत होते. {दोघांनीही सुप्रीम कोर्टात वकिली केली.{दोघांचेही किडनी प्रत्यारोपण झाले होते आणि दोघांचा मृत्यू एम्समध्येच झाला. 

बातम्या आणखी आहेत...