आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान शेतकरी योजनाः दरमहा मिळणारी 500 रुपयांची मदत भविष्यात वाढू शकते -अरुण जेटली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी पंतप्रधान किसान योजनेत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदत निधीत वाढ होण्याचे संकेत दिले. शेतकऱ्यांना दरमहा मिळणाऱ्या 500 रुपयांच्या निधीमध्ये भविष्यात वाढ होऊ शकते असे ते म्हणाले. अरुण जेटली सध्या अमेरिकेत उपचार घेत आहेत. भारतात त्यांच्या अनुपस्थितीमुळे काळजीवाहू अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. त्यावर वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया देताना जेटली बोलत होते. पंतप्रधान शेतकरी योजनेचा हा पहिलाच वर्ष आहे. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि त्यांना दिल्या जाणारा निधीमध्ये वाढ होईल असेही जेटलींनी सांगितले आहे.

 

एक फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आलेल्या बजेटमध्ये पीयूष गोयल यांनी पंतप्रधान शेतकरी योजनेची घोषणा केली. यात 5 एकर पर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये दिले जाणार आहेत. ही रक्कम 2-2 हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये विभागून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिली जाईल. या स्कीमचा लाभ देशभरातील 12 कोटी शेतकऱ्यांना मिळणार आहे. संपूर्ण रकमेचा सरासरी काढल्यास दरमहा 500 रुपये असा हा निधी आहे.


याच महिन्यात होणार निधीचे वाटप
अर्थ सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी वृत्तसंस्थेशी संवाद साधताना पीएम शेतकरी योजनेचा निधी वाटप करण्यासाठी शेतकऱ्यांचा डेटा सरकारकडे असल्याचे सांगितले. सोबत, फेब्रुवारीपासूनच या निधीच्या वाटपाला सुरुवात होणार आहे. ही योजना डिसेंबर 2018 पासून लागू करण्यात आली आहे. त्यानुसार, सरकारने 20 हजार कोटी रुपयांची तरतूद केली असे ते म्हणाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...