आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराना सुषमा नाराज आहेत,
ना जोशी निराश अन्
ना अडवाणी उदास
1. पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढणार आहेत. निर्णय तुमचा आहे की पक्षाचा?
उत्तर : कोणाला निवडणुकीत उतरवायचे हे पक्षच ठरवतो. पक्षाने मला निवडणूक लढायला सांगितले आणि मी या जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन.
2. मोदींना वाराणसीमधून उतरवण्याचा परिणाम इतर जागांवर होऊ शकतो. लखनौमधून राजनाथसिंह यांना उतरवण्याचा लाभही इतर जागांना होईल.
उत्तर : साहजिक आहे. मोठे नेते निवडणूक लढल्याचा परिणाम आसपासच्या मतदारसंघांवर होतो. मोदी व राजनाथसिंह ज्या जागांवर लढत आहेत त्याच्या जवळपासच्या मतदारसंघांवर सकारात्मक परिणाम होईल.
3. सुषमा नाराज आहेत, जोशी निराश आहेत आणि अडवाणी उदास आहेत. पक्षाच्या कार्यप्रणालीमुळे की एखाद्या व्यक्तीमुळे ?
उत्तर : हे तिन्ही अंदाज चुकीचे आहेत. ना कोणी निराश आहे, ना नाराज ना उदास आहे. सर्वच जण उत्साहात निवडणुकीच्या कामात गुंतले आहेत आणि मिशन 272+ साठी झटून कामाला लागले आहेत.
4. भाजप ही निवडणूक मोदींच्या नावाने लढत आहे की मुद्यांच्या नावाने?
उत्तर : दोन्हीही. काँग्रेसचे कुशासन, निर्णय न घेण्याची पात्रता, भ्रष्टाचार आणि महागाईसारख्या मुद्यांवर जे निराशेचे वातावरण आहे, त्यात मोदी आशेचे किरण आहेत.
5. मोदी आणखी कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढतील का?
उत्तर : असे काही होणार असेल तर त्यासाठी आमच्या निवडणूक समितीच्या पुढील बैठकीची वाट पहावी लागेल. निवडणूक समिती असा काही निर्णय घेईल, तर तुम्हाला अवश्य माहिती दिली जाईल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.