आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारचे उत्पन्न वाढल्यास शेतकऱ्यांना दरमहा 500 रुपयांपेक्षा जास्त रक्कम 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - भविष्यात शेतकऱ्यांना दरमहा ५०० रुपयांपेक्षा जास्त मदत दिली जाऊ शकते, असे संकेत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिले आहेत. मोदी सरकारने अंतरिम अर्थसंकल्पात लहान शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये (५०० रु. महिना) देण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेत उपचार घेत असलेले जेटली म्हणाले, भविष्यात सरकारच्या स्रोतांत वाढ झाल्यास रक्कम वाढवली जाऊ शकते. राज्य सरकारे आपल्याकडून अतिरिक्त रक्कम देऊ शकतात. जवळपास १५ कोटी भूमिहीन शेतकरी या योजनेच्या बाहेर राहतील. त्या संदर्भात जेटली म्हणाले, मनरेगाशिवाय ग्रामीण भागांसाठी चालवल्या जाणाऱ्या अन्य योजनांचा लाभ मिळेल. यादरम्यान आर्थिक प्रकरणांचे सचिव सुभाषचंद्र गर्ग म्हणाले की, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा हाेण्यास सुरुवात होईल. 

 

जेटली म्हणाले, काँग्रेस शेतकऱ्यांची ७ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी सर्वांत मोठे काम सांगते. वास्तवात केवळ ५२ हजार कोटी शेतकऱ्यांवर खर्च केला होता. कॅगच्या अहवालानुसार, उर्वरित रक्कम व्यापारी व घोटाळा करणाऱ्याकडे आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या मदतीची सुरुवात वार्षिक ७५ हजार कोटी रुपयांपासून केली आहे. यापुढे त्यात वाढ होईल. शेतकऱ्यांची समस्या दूर करण्याची जबाबदारी राज्यांवरही आहे. ते आपली योजना सुरू करून आर्थिक मदत देऊ शकतात. 

 

जेटली यांनी बेरोजगारीतील वाढीचा मुद्दा फेटाळून लावला. गेल्या ५ वर्षांत देशात कोणते मोठे सामाजिक वा राजकीय आंदोलन झाले नाही. नोकऱ्या निर्माण झाल्या नसतील तर लोकांत असंतोष वाढला असता. मात्र, तो काही कुठे दिसत नाही. विशेष म्हणजे, २०१७-१८ मध्ये बेरोजगारी ४५ वर्षांत सर्वांत जास्त होण्याचे वृत्त आल्यानंतर हा मुद्द्यावर वाद झाला. जीडीपीच्या नवीन आकडेवारीत नोटबंदीनंतर विकास दर १.१% वाढल्याबाबत टीका होत आहे. जेटली म्हणाले, मी पहिल्या दिवसापासून म्हणत आहे की, नोटबंदीनंतर विकासदर वाढेल. जगात पहिल्यांदा असे काही झाले नव्हते. त्यामुळे माजी पंतप्रधान मनमाेहनसिंग यांनी जेव्हा विकास दर २% नी घसरेल असे सांगितले तेव्हा ते योग्य मानले गेले. 

 

काँग्रेसने काहीच केले नाही, त्यामुळे त्यांना कळत नाही 
जेटली म्हणाले, मी नकारात्मकतेच्या नवाबांना सांगू इच्छितो की, आपल्या राज्य सरकारांनाही शेतकऱ्यांसाठी अशा योजना आणण्यास सांगावे. खताच्या सबसिडीशिवाय आरोग्य विमा, स्वस्त रेशन व अन्य डझनभर योजना ग्रामीण भागांसाठी राबवल्या जात आहेत. शिवाय आर्थिक मदत योजना सुरू केली . काँग्रेसला हे समजत नाही. कारण, त्यांनी काहीच केले नाही. 

कर संकलनातून अर्थव्यवस्था वाढीचे संकेत : जेटली म्हणाले, सकल राष्ट्रीय उत्पादनाची (जीडीपी) आकडेवारी अंदाजित असते. मात्र, कर संकलन वास्तव असते. लोकांचे उत्पन्न वाढल्यावर व खर्च वाढल्यावरच कर वाढतो. २०१६-१७ व २०१७-१८ मध्ये कर संकलन वाढीचा दर १५% हून १८% झाला आहे. यातून अर्थव्यवस्थेचा आकार वाढला. 

 

राहुलना कळले पाहिजे राष्ट्रीय निवडणूक लढवत आहोत 
जेटली यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध केला. त्यात त्यांनी केंद्र सरकार शेतकऱ्यांना प्रति दिन १७ रुपये देऊन त्यांचा अपमान करत असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी राष्ट्रीय निवडणूक लढवत आहेत, महाविद्यालयातील विद्यार्थी संघटनेची निवडणूक लढवत नाहीत, हे त्यांना कळले पाहिजे, असे जेटली म्हणाले. 

 

बजेटवरील चर्चेला उत्तर देण्यासाठी भारतात येऊ शकणार नाहीत जेटली 
अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देण्यासाठी भारतात येऊ शकणार नसल्याचे संकेत जेटली यांनी दिले आहेत. त्यांच्यावर सध्या अमेरिकेत उपचार सुरू आहेत. ६६ वर्षीय जेटली यांच्या अनुपस्थितीत पीयूष गोयल यांनी १ फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. जेटली म्हणाले, पीयूष गोयलच अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देतील, असे मला वाटते. 

 

निवडणुकीत मोदींविरुद्ध अराजकाचा मुद्दा होईल 
सार्वत्रिक निवडणुकीबाबत जेटली म्हणाले, मोदींविरुद्ध अराजक हा मुद्दा होईल. विरोधी पक्ष बनावट मुद्दा उचलत आहे. पहिला बनावट मुद्दा रफालचा होता. यानंतर १५ उद्योगपतींचे कर्ज माफ करण्याचा मुद्दा आला. प्रत्यक्षात तसे झालेच नाही. तिसरा बनावट मुद्दा ईव्हीएमचा होता. लोकांना ५ वर्षे स्थिर सरकार हवे की, ६ महिन्यांचे ते ठरवावे. 
 

बातम्या आणखी आहेत...