आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवन परिचयः वडिलांप्रमाणेच वकील बनले, शाळेत आणि महाविद्यालयात असे होते अरुण जेटली...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे वयाच्या 67 व्या वर्षी निधन झाले. कर्करोगावर उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना उपचारासाठी 9 ऑगस्ट रोजी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. याच ठिकाणी त्यांना जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते. 24 ऑगस्ट रोजी त्यांचे निधन झाले. एक वकील, राजकारणी आणि अर्थतज्ज्ञ अरुण जेटली यांचे वडील सुद्धा वकील होते. सोबतच, जेटली भाजप नेते असले तरीही त्यांचे सासरे एक काँग्रेस नेते होते.


> नवी दिल्ली येथील सेंट झेवियर्समध्ये शिकलेले अरुण जेटली लहानपणापासूनच अतिशय हुशार विद्यार्थी होते. याच ठिकाणी असलेल्या श्रीराम कॉलेजमधून त्यांनी पदवी घेतली. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी वकीलीची डिग्री घेतली आणि वडिलांप्रमाणेच प्रॅक्टिस सुद्धा सुरू केली.
> महाविद्यालायत शिकत असताना अरुण जेटली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (ABVP) नेते होते. 1974 मध्ये त्यांनी दिल्ली विद्यापीठात विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष पद सुद्धा भूषविले होते.
> अरुण जेटली राजकारणी होण्यापूर्वी एक प्रसिद्ध वकील म्हणून ओळखले जात होते. त्यांनी पेप्सीको आणि कोका कोला प्रकरणात सुप्रीम कोर्टात पेप्सिकोची बाजू मांडली होती. 2009 पासून त्यांनी वकीलीची प्रॅक्टिस सोडली.
> इंदिरा गांधींच्या कार्यकाळात आणीबाणी लागू झालेली असताना अरुण जेटलींना 19 महिने तुरुंगात डांबण्यात आले होते.
> 2000 मध्ये अरुण जेटली यांची राज्यसभेच्या सदस्य पदी निवड झाली. तसेच ते भाजपचे नेते सुद्धा बनले. या दरम्यान त्यांनी वाणीज्य मंत्रालय, कायदा मंत्रालय आणि न्याय मंत्रालय तसेच माहिती आणि प्रसारण मंत्रालय सुद्धा सांभाळले.
> कायदेतज्ज्ञ आणि राजकारणातील मुरब्बी नेते राहिलेले अरुण जेटली यांना क्रिकेटची विशेष आवड होती. त्यांनी बीसीसीआयचे उपाध्यक्ष पद सुद्धा भूषविले होते. आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगचे प्रकरण समोर आल्यानंतर त्यांनी बीसीसीआयच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता.
> अटल बिहारी वाजपेयी यांच्या निवृत्तीनंतर आणि प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर अरुण जेटली भाजपचा चेहरा म्हणून समोर आले. ते भाजपची राष्ट्रीय स्तरावर आवाज बनले. 2009 मध्ये ते राज्यसभेत भाजपचे विरोधीपक्ष नेते बनले. तर 2014 च्या निवडणुकीत त्यांच्या व्यूहरचनेने भाजपला ऐतिहासिक यश मिळवून दिले होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या विजयात जेटलींचा सिंहाचा वाटा होता. परंतु, अमृतसर येथून अमरिंदर सिंग यांनी त्यांचा पराभव केली. 
> अरुण जेटली यांनी संगीता डोग्रा यांच्याशी विवाह केला होता. त्या काँग्रेसचे नेते आणि जम्मू-काश्मीरचे माजी अर्थमंत्री गिरधारीलाल डोग्रा यांच्या कन्या आहेत. अरुण जेटली आणि संगीता यांना एक मुलगा रोहन आणि मुलगी सोनाली आहेत.

बातम्या आणखी आहेत...