आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Arun Jaitley Move To Opt Out Govt Due To Health Reason, Arun Jaitley Tells PM Narendra Modi

अरूण जेटली यांनी घेतली राजकारणातून निवृत्ती, आजारपणामुळे नवीन सरकारमध्ये काम करू शकत नाही असे मोदींना पत्राद्वारे कळवले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून नवीन सरकारमध्ये सामील होण्यास असमर्थ असल्याचे सांगितले आहे. जेटली यांनी पत्रात आपल्या आरोग्याचे कारण दिले आहे. मोदींनी 2014 मध्ये सरकार चालवण्यासाठी जेटली यांना तीन मंत्रालये दिली होती. त्यात, अर्थ, रक्षा आणि सूचना आणि प्रसारण हे विभाग होते. मागील 7 मे रोजी किडनी ट्रांसप्लांटनंतर  जेटली यांचे तब्येत पूर्णपणे ठीक झालेली नाहीये. फेब्रुवारीमध्ये झालेले शेवटचे बजेटदेखील ते सादर करू शकले नव्हते. त्यावेळी जेटली अमेरीकेत उपचार घेत होते आणि त्यांच्या जागेवर पीयूष गोयल यांनी बजेट सादर केले होते.


जेटली यांनी पत्रात लिहीले
''मागील 5 वर्षे सरकारचा एक भाग होणे माझ्यासाठी गर्वाची गोष्ट आणि नवीन अनुभव शिकण्यास मिळाला. मागील 18 महिन्यांपासून गंभीर आजाराने त्रस्त झालो आहे. पण, डॉक्टरांनी योग्य उपचार करून मला बऱ्यापैकी ठीक केले आहे. तुमचा निवडणूक प्रचार संपल्यावर आणि केदारनाथला जाण्यापूर्वी मी स्वतःहून तुम्हाला भेटून सांगितले होते की, नवीन सरकारमध्ये सामील होऊ शकणार नाही. यानंतरही पक्षाची अनौपचारीक पद्धतीने मदत करत राहील.''


जेटली 3 आठवडे ऑफीसला जाऊ शकले नव्हते- सुत्र
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जेटली यांची तब्येत मागील काही आठवड्यांपासून खराब आहे. त्यांना काही तपासण्यांसाठी एम्समध्ये भर्ती केले होते. डॉक्टरांनी त्यांना उपचारासाठी यूके आणि यूएसला जाण्याचा सल्ला दिला आहे. ते मागील तीन आठवड्यांपासून आपल्या ऑफीसला गेले नाहीयेत. लोकसभेत मिळालेल्या विजयानंतरही ते भाजपच्या कार्यक्रमात दिसले नव्हते. मागील शुक्रवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीतही ते सामील झाले नव्हते.


जेटली यांना दोन वेळा सुरक्षा खाते मिळाले आहे
मे 2014 मध्ये मोदी सरकार आल्यानंतर जेटली यांना अर्थ आणि सुरक्षा मंत्रालय हे दोन व विभाग देण्यात आले होते. 2014 मध्ये ते 6 महिने रक्षा मंत्री होते. त्यानंतर मनोहर पर्रिकर यांना ते खाते देण्यात आले. पण काही कारणास्तव पर्रिकर यांना परत गोव्याचा मुख्यमंत्री बनवण्यात आले. त्यानंतर 2017 मध्ये जेटली यांना परत रक्षा खात्याची जबाबदारी मिळाली. 6 महिन्यानंतर निर्मला सीतारमण यांना रक्षा मंत्री बनवण्यात आले. जेटली यांच्या आजारपणामुळे पीयूष गोयल यांनी दोनवेला अर्थ मंत्रालयाची जबाबदारी पार पाडली आहे.

बातम्या आणखी आहेत...