आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Arun Jaitley's Nature Worsens, Jaitley Is On Life Support System At AIIMS Hospital

अरुण जेटलींची प्रकृती खालावली, एम्स रुग्णालयात लाइफ सपोर्ट सिस्टिमवर आहेत जेटली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - माजी अर्थमंत्री तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांची प्रकृती शनिवारी आणखी खालावली. त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक नेत्यांची त्यांची भेट घेतली. यानंतर शनिवारी बसप प्रमुख मायावती यांनी देखील रुग्णालय गाठले. तत्पूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील रुग्णालयात जाऊन जेटलींची विचारपूस केली. जेटली यांना श्वास घेण्यात अडथळा येत असल्याने त्यांना 9 ऑगस्ट रोजीच एम्समध्ये दाखल करण्यात आले.
 

जेटलींना नेमके काय झाले?
जेटलींना ईसीएमओ (एक्स्ट्रा-कॉर्पोरिअल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन) वर ठेवण्यात आले आहे. यालाच लाइफ सपोर्ट देखील म्हटले जाते. दीर्घकाळ पर्यंत हृदय आणि श्वास सुरू ठेवण्यात मदत करण्यासाठी या उपकरणांचा वापर केला जातो. ज्यांचे हृदय आणि श्वसन यंत्रणा व्यवस्थित काम करत नाही त्यांच्यासाठी ही सिस्टिम अत्यंत आवश्य मानली जाते. एम्स रुग्णालयाने 9 ऑगस्ट रोजी एक हेल्थ बुलेटीन जारी केले होते. त्यानंतर जेटलींच्या आरोग्यावर काहीच अपडेट अधिकृतरित्या समोर आलेले नाहीत. डॉक्टरांची एक टीम सातत्याने जेटलींची काळजी घेत आहे. जेटली यांच्यावर सॉफ्ट टिश्यू कॅन्सर संदर्भात उपचार सुरू होते. याच आजारामुळे त्यांना 13 जानेवारी रोजी उपचारासाठी न्यूयॉर्कला जावे लागले. यानंतर फेब्रुवारीमध्ये ते देशात परतले.

बातम्या आणखी आहेत...