Home | National | Other State | Arunachal pradesh's MLA Tirong Aboh and his family killed by terrorist

निकालापूर्वीच अरुणाचलमध्ये एनपीपी आमदाराची हत्या, कुटुंबीयांसह 11 ठार

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 22, 2019, 09:04 AM IST

खोंसा पश्चिम विधानसभेचे विद्यमान आमदार होते तिरोंग

 • Arunachal pradesh's MLA Tirong Aboh and his family killed by terrorist

  ईटानगर(अरुणाचल प्रदेश)- येथील तिराप जिल्ह्यातील एनपीपी नेते तिरोंग अबोह आणि त्यांच्या मुलासहीत घरातील 11 जणांची हत्या करण्यात आली आहे. नॅशनल सोशलिस्ट काउंसिल ऑफ नगालंड(एनएससीएन) च्या दहशदवाद्यांनी मंगळवारी सकाळी 11:30 वाजता त्यांच्या घरावर हल्ला केला.

  अबोह 2014 मध्ये पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलच्या तिकीटावर खोंसा पश्चिम विधानसभेतून आमदार म्हणून निवडणून आले होते. यावेळेस ते एनपीपीच्या तिकीटावर परत एकदा निवडणूक लढवत होते. अरुणाचलमध्ये 2 लोकसभेच्या जागांसहितच 60 विधानसभेच्या जागांसाठीही मतदान झाले होते.

  एनपीपी अध्यक्षांनी गृहमंत्रालयाला या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची अपील केली
  मेघालयचे मुख्यमंत्री आणि एनपीपी अध्यक्ष कोनराड यांच्यां संगमाने या हल्ल्याची कठोर शब्दात निंदा केली आहे. त्यांनी पंतप्रधान कार्यालय आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली. संगमा म्हमाले की, "आम्ही तिरोंग आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हत्येने हैराण झालो आहोत, आम्ही या हल्ल्याची निंदा करतो. मोदीजी आणि राजनाथजींनी याविरूद्ध काहीतरी अॅक्शन घ्यावी."

  घटनेसाठी भाजप सरकार जबाबदार-काँग्रेस
  प्रदेश काँग्रेसने या घटनेसाठी भाजपवर आरोप लावले आहेत. काँग्रेसने म्हटले की, भाजपच्या सरकारमध्ये लोकप्रतिनिधीच सुरक्षीत नाहीयेत, तर मग सामान्य लोक कसे सुरक्षीत राहतील. त्यासोबतच मुख्यमंत्री पेमा खांडू आणि भाजप सरकार राज्यातील या परिस्थितीस जबाबदार असल्याचे ते म्हणाले. पक्षाने याप्रकणी उच्च स्तरिय तपासाची मागणी केली आहे.

Trending