आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माणसाच्या हृदयाला व्हायब्रेट करतं ही पत्राची खरी ताकद - अरविंद जगताप, तर अभिनेते सयाजी शिंदे यांची विशेष उपस्थिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद : सोशल मीडियावर मेसेज, पोस्ट आल्यास मोबाइल 'व्हायब्रेट' होतो. परंतु पत्रं माणसाच्या हृदयाला 'व्हायब्रेट' करतात, ही पत्रांची खरी ताकद आहे, अशा शब्दांत पत्रलिखाणाची महती ख्यातनाम लेखक, कवी अरविंद जगताप यांनी सांगितली. 

'एका पत्राची ताकद' या विषयावर दैनिक दिव्य मराठीचे कार्यकारी संपादक सचिन काटे यांनी त्यांना बोलते केले. लाेकप्रिय चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे उपस्थित हाेते. या सत्राला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. विशेषत: महाविद्यालयीन तरुण-तरुणींनी गर्दी केली होती. सभागृह पूर्ण भरल्यामुळे अनेक जणांनी उभे राहूनच हा संवाद ऐकला. जगताप म्हणाले, संवादाची माध्यमं अाज पूर्णपणे बदलली अाहेत. त्यात माेबाइलनं माणसांच जगणं व्यापलं अाहे. मेसेज, पोस्ट आल्यास खिशातला मोबाइल व्हायब्रेट होतो. मात्र पत्रं माणसांच्या हृदयाला व्हायब्रेट करतात, ही पत्रांची खरी ताकद अाहे. इतिहास केवळ पत्रांमुळेच अापल्यापर्यंत अाला अाहे. पत्रलेखनात किंवा कोणत्याही साहित्य लिखाणात समर्पक शब्दांची मांडणी महत्त्वाची असते. हृदय पिळवटून टाकण्याचे सामर्थ्य शब्दांमध्ये असते. सभोवतालचा परिसर पाहता पाहता माणसंही वाचायला पाहिजे, त्यातूनच कसदार साहित्यकृती जन्माला येत असते. वाचन अाणि निरीक्षण या दाेन गाेष्टी लिहित्या माणसाला ताकद देत असतात. कामाच्या प्रेमात पडलं की कामात हमखास यश मिळतं. या वेळी दिव्य मराठीच्या वतीने घेण्यात अालेल्या पत्रलेखन स्पर्धेबाबत स्वाती फलटणकर यांनी माहिती दिली. काही दिवसानंतर दिव्य मराठीत विजेत्यांची नावे जाहीर करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. या सत्रात जगताप व सयाजी शिंदे यांना उपस्थितांनी प्रश्न विचारले. 

 

ग्रामीण भागातच टॅलेंट : अभिनेता सयाजी शिंदे 
अभिनेता सयाजी शिंदे म्हणाला, दया पवारांच्या कवितांनी मला कवितेकडे अाकर्षित केलं. साहित्याची गाेडी लागली. साहित्य निर्मितीत अाशय महत्त्वाचा असताे. कोणत्याही निर्मितीच्या भाषेपेक्षा तिचा अाशय अधिक महत्त्वाचा असताे. त्यामुळे शुद्ध-अशुद्ध असा फरक करून चालणार नाही. ग्रामीण भाषा हीच अापली अस्सल भाषा अाहे. अाज ग्रामीण भागातील माणसांना कमी लेखण्याचे प्रकार सुरू अाहेत. मात्र ग्रामीण भागातील लोकांमध्येच खरे टॅलेंट अाहे. सर्व क्षेत्रांसह अभिनय अाणि लेखनाच्या क्षेत्रात ग्रामीण भागातील माणसंच चांगलं काम करू शकतात, कारण खऱ्या अर्थाने त्यांनाच माणसाचं जगणं समजलेलं असतं. निसर्गाशी त्यांचा दररोजचा संवाद असताे. ग्रामीण भागाची नाळ अाजही मातीशी घट्ट बांधली गेली अाहे. त्यामुळे ग्रामीण भागातील युवकांनी अात्मविश्वासाने प्रत्येक क्षेत्रात पाऊल ठेवले पाहिजे. 

 

किमान एक तरी झाड लावा 
वृक्षलागवड चळवळीत काम करणारे सयाजी शिंदे म्हणाले, प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून महाराष्ट्राला समृद्ध करायला हवे. वृक्षांची लागवड करण्याची जबाबदारी अापल्या प्रत्येकाचीच आहे. 

बातम्या आणखी आहेत...