आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापश्चिम एक्स्प्रेसमधून...
‘केजरीवाल यांचा तर मोर झाला आहे. बिचारे जिथे जातील तिथे त्यांच्या मागे काही ना काही गडबड होते. गुजरातेत गेले तर पोलिसांनी पकडले. मुंबईमध्ये गुन्हा दाखल झाला. करनालमध्ये आले तर तेथेही पोलिस केस झाली. परंतु त्यांची डाळ शिजणार नाही, असे दिसते. ते आत म्हणाले, ‘मोदींना पाठिंबा देतो. बाहेर येता पुन्हा पलटले.’ कोच नंब बी - 3 मध्ये दाखल होताच केजरीवाला यांच्या नावावर वरील चर्चा कानी पडली. माझी जागा पुढे होती. परंतु दोघांना सरकवून मी तिथेच जागा केली. कारण अशा चर्चा ऐकण्यासाठीच तर मी रेल्वेने प्रवास करत रूळ मोजत आहे.
माझ्या समोर बसलेला एक वयस्क म्हणाला, ‘मोदींसमोर केजरीवाल काहीच नाही. मोदीला ऐकण्यासाठी लोक शंभर रुपये देऊनही जातात. पाच रुपयांपासून तिकिट सुरू केले होते त्यांनी. आज बघा हैदराबादेत 100 रुपये तिकिट लावले होते. दहा वष्रे मनमोहनला दिली. 65 वर्षांपासून काँग्रेसचेच सरकार होते. काय मिळाले? आता यांनाही द्या पाच वष्रे मोदीने गुजरात डेव्हलप करून दाखवला. काय नाही आज गुजरातमध्ये? झाडू कितीही चांगल्या दर्जाचा असू द्या 45 दिवसांपेक्षा जास्त दिवस चालत नाही. केजरीही नाही चालणार. त्याला तर मुख्यमंत्रीपदही झेपले नाही. ना याडे का, ना उडे का (ना इकडचा ना तिकडचा). मोदी तर पीएमपदाचा दावेदार आहे. पण बघा सीएमपदाचेही काम करत आहे.’ एअर कंडिशन दुरुस्ती, विक्रीचा व्यवसाय करणारे रविंदर कुमार पंडत केजरीवालबाबत बोलताना एकदम जोशात आले. म्हणाले, ‘माझे एक दोस्त हुड्डा यांचे खासमखास आहेत. सरकारी एज्युकेशन सेंटरचे प्रमुखपद तेव्हापासून सांभाळत आहेत, जेव्हापासून भूपिदंरसिंह हुड्डा हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदी आहेत. परंतु आता त्यांनीही पॅकींग सुरू केली आहे. ते म्हणतात, गुदडे ठा कै जाणा ए दिक्खै सै (आता तर जावेच लागणार).’ पंडत यांच्यासोबत मित्र रमरेत धनखड हेही प्रवास करत होते. आता त्यांची पाळी होती. म्हणाले, ‘अरे त्यांचेच कशाला घेऊन बसलात. माझे व्याही सूरजमल, हुड्डा यांच्या जवळचे आहेत.परंतु सूरजमल स्वत: म्हणतात, पंतप्रधान तर मोदींनाच बनवायचे आहे.’
ट्रेन आणि चर्चा सुरूच होती. 22 वर्षीय दीपक ठाकर हा तरुण त्याची त्याची वेळ येण्याची वाट बघत होता. तो म्हणाला, ‘गेल्याच आठवड्यात मी माझे नाव यादीत नोंदवले. त्यावेळी रांगेत एक 86 वर्षीय वृद्ध उभे होते. त्यांना विचारले, ‘ताऊ तुम्ही यादीत नाव नोंदवून काय करणार आहात?’ तर म्हणाले, ‘मन्ने तो सिरफ मोदी तै वोट देन खातर अपना कारड बनवाना सै (मी तर फक्त मोदीला मत देण्यासाठीच कार्ड बनवतो आहे.)’ कोपर्यातून दुसरा आवाज आला, ‘हरियाणात तर बीजेपीच. लिहून घ्या तुम्ही.. 10 जागांपैकी आठ तर नक्कीच. दीपेंदर हुड्डाची एखादी जागा वाचली तरी खूप झाले.’ त्या महाशयांना मी नाव विचारले तर म्हणाले, ‘मुरली मनोहर. पुन्हा जोड देत म्हणाले, नाव तर माझेही मुरली मनोहर आहे. पण मला थोडेच कुणी तिकिट देणार आहे? जोशी लावले तर तिकिट मिळेल.’ मनोहरजी सांगू लागले, ‘केजरीवालकडे पाच लोक मिळून निर्णय घेतात. भाजपकडे 21 नेते, पदाधिकारी आहेत. त्यावर 63 सदस्य आहेत. त्यांच्या समितीत. मग समिती जे सांगेल ते फायनल.. तिकडे बघा कुमार विश्वास रडत आहे आणि काँग्रेसचा तर बँड वाजलाच म्हणून समजा..’ मी जाट आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. त्वरीत म्हणाले, ‘जाटांना आरक्षण द्या अथवा न द्या.काम झाले तरच मत मिळेल.’ जवळ बसलेली जिला सिंह यांच्या पत्नीनेही पुरुषांच्या सभेत बोलण्याचे धाडस एकवटत म्हणाली, ‘काँग्रेसने सिलिंडर महाग केले.किती महागाई वाढवली आहे. दहा हजार कमावले तरीही गुजराण होत नाही.’ बायकोला बोलताना पाहून जिले सिंह यांच्या डोळ्यात अंगार दाटले. ते म्हणाले, ‘त्या शीला दीक्षितला बघा म्हणाली, 21 रुपयांत भोजन मिळेल. तुम्हीच सांगा असे कुठे आहे का?’ पंडत म्हणाले, ‘तर शीला व केजरीमध्ये फरक तो काय? केजरीवाल रॉकेटसारखा आहे. जितक्या वेगाने वर जाईल, तेवढय़ाच वेगाने खाली येईल. त्याने ऑटोरिक्षावाल्याला मंत्री बनवले. आता बिचारा रिक्षाही धडपणे चालवू शकणार नाही. लोक म्हणतील,एमएलएसाहेब रिक्षा चालवत आहेत. रिक्षा चालवणार नाही तर भाकरी कुठूण आणणार?’पंडतजीचे मन भरले नव्हते. पुन्हा सुरू झाले, ‘असे आहे बघा.. लाट तर भाजपचीच आहे. कुणीही उभे राहावे. जनरल असो वा जवान. आता व्ही. के. सिंहांचेच बघा सगळे आयुष्य बाहेर नोकरी केली. मुले विदेशात शिकली. त्यांना स्थानिक कसे काय म्हणायचे? पण भाजपच्या लाटेत तेही जिंकतील. नाही तरी दुसरे कोण प्रामाणिक आहे..’ सोनीपत स्थानकावर रेल्वे थांबली. तर जिले सिंह पुन्हा म्हणाले, ‘हे नेते या शहरासारखे आहेत. कुणाचेच सोयरे नसतात.’ र्शवणकुमार येथे आला त्या वेळी त्याने आई - वडिलांकडे किराया मागितला होता. लोककथा आहे ही. जाट राजकारणाचा. कनेक्टिंग ट्रेनमधून हॉच फॉर्म्युला समजून घेण्याचा प्रयत्न केला. आता मी पोहोचले माझ्या हरियाणातील पानीपत स्थानकावर.
पुढचे स्टेशन अमृतसर..
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.