आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरविंद केजरीवालांचा वाराणसीत तळ, मोदींवर हल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाराणसी - आपचे समन्वयक अरविंद केजरीवाल दुसर्‍या दिवशीही वाराणसीमध्ये तळ ठोकून होते. त्यांनी रोहानिया आणि सेवापुरी गावांचा दौरा केला. सिगरा स्टेडियममध्येही ते गेले. मोदी यांनी हिरानगरमध्ये एके-49 पाकिस्तानचे एजंट आहेत, असे म्हटल्यावर केजरीवाल संतापले.

गुजरात सरकारवर
केजरीवाल यांनी सर्वप्रथम गुजरात सरकारने दिलेल्या उत्तरावर प्रतिक्रिया दिली. गुजरात सरकारचे दावे खोटे आहेत, असे ते म्हणाले. त्यांनी मोदी यांना लिहिलेले एक पत्रही दाखवले. मोदी पंतप्रधान झाल्यास गॅस तिप्पट तर वीज दुप्पट महाग होईल, असा दावा त्यांनी केला. मोदी नैसर्गिक वायू उत्खननाचा दर 14 पासून 16 डॉलर प्रतियुनिट करण्यास तयार झाले होते.

जेटली, सुषमांवर निशाणा
यानंतर केजरीवाल यांनी रॉबर्ट वढेरा यांच्या जमीन घोटाळ्याबाबत 2012 मध्ये बोलल्याचे सांगितले. संबंधित कागदपत्रे मार्च 2011 मध्ये जेटली आणि सुषमा स्वराज यांच्याकडे पोहोचली होती, हे सत्य नाही काय? राजस्थानमध्ये अनेक जमीन घोटाळे वढेरा यांनी केले आहेत. वसुंधराराजे सरकारने कोणताही एफआयआर का दाखल केला नाही?

मोदी यांच्यावर पलटवार
केजरीवाल करधाना येथे पोहोचले तेव्हा मोदी यांनी त्यांना पाकिस्तानी एजंट असल्याचा आरोप केला होता. केजरीवाल त्यावर म्हणाले, मोदी यांनी मुद्द्याचे बोलावे. पंतप्रधानपदाच्या उमेदवारास अशा पद्धतीची भाषा शोभत नाही.

ट्विटरवर शाब्दिक चकमक : मोदी यांच्या आरोपामुळे संतापलेले केजरीवाल केवळ करधानामध्ये प्रतिक्रिया देऊन थांबले नाहीत. त्यांनी ट्विटरवर म्हटले की, मोदी आपल्या मंत्रिमंडळातील भ्रष्ट लोकांवर उत्तर देत नाहीत. गॅसच्या किमतीवर काही बोलत नाहीत. विकासाच्या दाव्यावर स्पष्टीकरण देत नाहीत. येदियुरप्पा, श्रीरामुलू आणि रामविलास पासवान यांच्यावर गप्प आहेत. ते केवळ माझ्याविरुद्ध वाईट शब्दांचा वापर करतात. ही योग्य बाब नाही.