आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी कुणाच्या मुलीसोबत पळून गेलो नाही, अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्याने खळबळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- एकिकडे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला शांततेत सुरवात झाली आहे तर दुसरीकडे आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत आले आहे. चांदनी चौक येथील प्रचार सभेला संबोधित करताना केजरीवाल म्हणाले, की सगळे म्हणतात मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन पळून गेलो. परंतु, मी काही कुणाच्या मुलीसोबत पळून गेलो नाही, की पाकिस्तानात पळून गेलो नाही. याची एवढी चर्चा का करण्यात येत आहे?
मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याचे समर्थन करताना अरविंद केजरीवाल म्हणाले, की काही लोक म्हणतात मी पळून गेलो. परंतु, मी तर येथेच आहे. मी एखाद्याच्या मुलगीसोबत पळून गेलो नाही. भ्रष्टाचाराविरोधी लढा देण्यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत कटिबद्ध आहे. मी काही पाकिस्तानातही पळून गेलो नाही. याचा एवढा मुद्दा का करण्यात येत आहे?
आपचे उमेदवार आणि माजी पत्रकार आशुतोष यांचा प्रचार करताना अरविंद केजरीवाल यांनी स्वतःची तुलना अर्जुनाशी केली तर नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी व्हिलन असल्याचे सांगितले. केजरीवाल म्हणाले, की महाभारतातील युद्धापूर्वी दुर्योधन कृष्णाला भेटायला गेला होता. तेव्हा दुर्योधनाने कृष्णाची सेना मागितली तर अर्जुनाने कृष्णाला सोबत करण्याची विनंती केली. आज मोदी आणि गांधी यांच्याकडे पैशाची शक्ती आहे. परंतु, आमच्याजवळ साक्षात देव आहे. त्यामुळे विजय आमचाच होणार.