आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मरणाची भीती दाखवून अरविंद केजरीवाल यांची भावनिक साद, थप्पडवर बोलकी प्रतिक्रिया

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- येत्या काही दिवसांमध्ये माझ्यावर आणखी भयानक हल्ले होतील. मला ठारही मारले जाऊ शकते, असे आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी सांगितले आहे. माझ्यावर कितीही हल्ले केले तरी मी प्रत्युत्तर देणार नाही, असे पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रस्ताव नाकारत केजरीवाल म्हणाले आहेत.
केवळ तुमच्यावरच हल्ले का केले जातात, या प्रश्नावर बोलताना केजरीवाल म्हणाले, की येत्या काही दिवसांत माझ्यावर आणखी हल्ले होण्याची मला भीती वाटते. मला ठारही मारले जाऊ शकते. परंतु, तरीही माझ्यावर ज्यांनी हल्ला केला आहे त्यांना मी माफ केले आहे. कोणत्याही समस्येचे उत्तर चर्चेत असते हिंसाचारात नाही, ही माझी भूमिका आहे. पोलिसांची इच्छाशक्ती असेल तर ते याप्रकरणी तपास करू शकतात. पोलिसांना सगळे काही माहित आहे.
केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या दिशेने पत्रकार जर्नेलसिंग याने बुट फेकून मारला होता. दिल्लीत झालेल्या शीख विरोधी दंगलींचा निषेध करण्यासाठी त्याने हे कृत्य केले होते. त्यावर आम आदमी पक्षाने जर्नेलसिंग याचे समर्थन केले होते. त्याला दिल्लीतून उमेदवारीही देण्यात आली आहे. शीख विरोधी दंगलीचा मुद्दाही या पक्षाने लावून धरला आहे. त्यामुळे केजरीवाल यांच्यावर झालेल्या हल्ल्याची चौफेर चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे.