आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arvind Kejriwal Rally In Bangalore Latest News In Marathi

केजरीवालांनी स्विकारले मोदींचे आव्हान, वाराणसीचा अंतिम निर्णय 23 मार्चला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे तिकीट पक्के होताच आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी मोदींविरुद्ध लढण्याची तयारी असल्याची घोषणा केली. बंगळुरूत रविवारी झालेल्या सभेत केजरीवाल म्हणाले, पक्षाने मला आधीच तिकीट दिले आहे, परंतु आधी वाराणसीतील जनतेला विचारीन. त्यांनी होकार दिला तर आव्हान स्वीकारणार आहे.

मोदी यांनी दोन जागांवरून निवडणूक लढवण्याच्या मुद्दय़ावर केजरीवाल म्हणाले, मोदी गुजरातेतून लढत असल्याचे ऐकिवात आहे. त्यांना सुरक्षित मतदारसंघ हवा आहे काय? तशी गरज का वाटते आहे? आम्हाला तर सार्मथ्यवान पंतप्रधान हवा आहे. सुरक्षित मतदारसंघ शोधणारा नको, असा टोलाही त्यांनी लगावला. मोदी पंतप्रधान झाले तर श्रीरामलु खणिकर्म मंत्री होतील. येदियुरप्पा मंत्री होतील. मोदींविरुद्ध निवडणूक लढवणे आव्हान असल्याचे कबूल करतानाच दूर पळणार नसल्याचे ते म्हणाले. वाराणसीत 12 मे रोजी मतदान आहे.
पुढील स्लाइडमध्ये, केजरीवालांचे चार टार्गेट