आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arvind Kejriwal Ready To Take On Modi News In Marathi

वाराणसीत केजरीवाल भिडणार, आता रामदेव वाद नाही घालणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोदी वाराणसीमधून निवडणूक लढवणार हे निश्चित होताच दावे आणि धमक दाखवून देण्याचा कलगीतुरा सुरू झाला आहे. ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांनी वाराणसीला जाण्याची घोषणा केली आहे. रामदेव यांनी पुन्हा घूमजाव केले व मोदींचे कौतुक व सर्मथन दोन्हीही करून टाकले.

मोदींचा सामना करण्यास तयार : केजरीवाल
राहुल गांधींप्रमाणेच आम्हाला मोदींनाही हरवायचे आहे. पक्षाने मला वाराणसीमधून तिकीट दिले आहे. हे आव्हान स्वीकारायला मी तयार आहे. परंतु निर्णय वाराणसीच्या लोकांनाच घ्यायचा आहे. 23 मार्च रोजी तेथे सभा घेईन. लोकांना विचारीन. लोकांनी म्हटले तर मी नक्कीच लढेन. - अरविंद केजरीवाल (बंगळुरूमध्ये आयोजित ‘आप’च्या सभेत)

अन्वयार्थ
- मागील काही महिन्यांत झालेली नकारात्मक प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न.
- मोदींविरुद्ध लढल्यास मीडियामध्ये चर्चेत राहतील.
- अजूनही धमक असल्याचा कार्यकर्त्यांना विश्वास देण्याची धडपड.