आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Arvinder Singh Arrested By Delhi Police For Assaulting Sharad Pawar In 2011, Found Guilty In Two Cases

2011 मध्ये शरद पवारांवर हल्ला करणाऱ्याला 8 वर्षानंतर पोलिसांनी केले अटक, दोन खटल्यामध्ये आढळला दोषी आढळला  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- 2011 मध्ये देशाचे तत्कालिन कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कानशिला लगावणाऱ्या व्यक्तीला दिल्ली पोलिसांनी आता अटक केली आहे. अरविंदर सिंग उर्फ हारविंदर सिंग(वय 36) या आरोपीला पोलिसांनी मारहाणीच्या दोन खटल्या अंतर्गत ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध भा.दं.वि. कलम 323, 353, 506, आणि 309 अंतर्गत कॅननॉट प्लेस पोलिस स्टेशनमध्ये आणि भा.दं.वि. कलम 186, 353 आणि 506 अंतर्गत लोकसभा मार्ग पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल होता. संबंधित आरोपी अनेक वर्षांपासून शिक्षेपासून वाचला होता. अरविंदर सिंग याच्या विरुद्ध पहिला खटला 24 नोव्हेंबर 2011 मध्ये कॅननॉट प्लेस पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला होता. त्यावेळेस त्याने एनडीएमसी कनव्हेन्शन हॉलमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेले राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या कानशिलात लगावली होती. या प्रकरणी अरविंदर सिंगला अटक करण्यात आली होती आणि त्याचाविरुद्ध खटला सुरू होता. पण, खटल्याच्या वेळी तो अचानक गायब झाला आणि 29 मार्च 2014 रोजी परगती, एलडी एमएम, पटियाळा हाऊस कोर्टाने त्याला अट्टल गुन्हेगार घोषित केले होते.
दुसरा खटला त्याच्यावर लोकसभा मार्ग पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला होता. यावेळी त्याने जंतर-मंतरवर एका ऑन ड्यूटी पोलिस कॉन्स्टेबलला मारहाण केली होती. यावेळेसही खटला सुरू असताना तो अचानक गायब झाला. त्यानंतर परत पटियाळा हाऊस कोर्टाने त्याला गुन्हेगार घोषित केले. त्यानंतर मंदीर मार्ग पोलिस स्टेशनमधील एसीबी स्वरुप यादव यांच्या सांगण्यावरुन पोलिस उप-निरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल कुलदीप सिंग यांनी त्याला अटक केले. 

बातम्या आणखी आहेत...