आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून चुलत भावाच्या मुलाचा खून, आरोपीला मिळाली जन्मठेपेची शिक्षा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यमुनानगर(हरियाणा)- गोविंदपूरीमध्ये आठ वर्षीय यतीनची हत्या केल्याप्रकरणी आरोपी काका राहुल त्यागीला कोर्टाने दोषी करार देत, आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तो आता त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुरूंगात राहणार आहे. हा निर्णय सेशन न्यायाधीश बिमलेश तंवर यांनी दिला. कोर्टाने आरोपीवर दहा हजार रूपयांचा दंडदेखील लावला आहे. 

 

याप्रकरणी कुटुंबीयातील हसा लोकांनी साक्ष दिली. 8 वर्षीय यतीनची चाकूने गळा चिरून हत्या करण्यात आली होती. त्याच्या डोक्यात आणि अंगावर लोखंडी रॉडने अनेक वार करण्यात आले होते. यामुळे त्याच्या शरिराचे तुकडे संपूर्ण रूममध्ये पसरले होते. त्याचा खून 19 ऑक्टोबर 2017 ला दिवाळीच्या दिवशीच झाला होता. पोलिसांचेदेखील म्हणने होते की, इतकी क्रुरपण झालेली हत्या त्यांनीही पहिल्यांदाच पाहिली आहे. 
 


राहुलने चौकशीत सांगितले की, त्याचे चार महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. त्यांचा चुलत भाऊ अमरजीत आणि राहुलचे घर बाजुलाच आहे. त्याला संशय होता की, अमरजीतचे त्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. त्याने आपल्या पत्नीचा फोटोदेखील अमरजीतकडे पाहिला होता. त्यानंतर त्याने अमरजीतला अद्दल घडवण्यासाठी त्याच्या मुलाच्या हत्येचा प्लॅन केला. राहुलचे बेडरूम गच्चीवर होते, त्याने यतीनला आपल्यासोबत नेले. तिथे त्याने यतीनची हत्या केली आणि घटास्थाळवरून फरार झाला. 
 
 

बातम्या आणखी आहेत...